भाजप आ. जयकुमार गोरेंचा विरोधकांवर निशाना; म्हणाले की,

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | खटाव आणि माण तालुक्यामध्ये कधीच दुजाभाव केला नाही. ‘टेल टू हेड’ पाणी देण्याचा कायदा असूनही, खटावला पाणी देण्याला नेहमी प्राधान्य दिले आहे. आताही उरमोडीचे पाणी कळंबीपासून वडूज परिसरातील सातेवाडी भागात वाहत आहे. येरळा नदीतही जिहे-कठापूर योजनेतून पाणी येईल, तितके पाणी नेर धरणातून सुरू आहे. त्यानंतरही काही नेहमीचे आंदोलक वडूजमध्ये आंदोलनाची नौटंकी करत आहेत. त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांना पाणी आणायचे सोडा, पण एकही विकासकाम करता आले नाही, अशी घणाघाती टीका भाजप आ. जयकुमार गोरे यांनी केली.

वडूज, ता. खटाव येथे रविवारी भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगराध्यक्ष मनीषा काळे, नगरसेविका रेश्मा बनसोडे, शशिकांत पाटोळे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे उपस्थित होते. आ. गोरे म्हणाले, मी आमदार झाल्यापासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये जात आहे. हजारो हेक्टरवरील लाखो टन ऊस तालुक्यातील कारखान्यांना जात आहे.

योजनेचे पाणी येत आहे. अथक प्रयत्नांनंतर जिहे-कठापूरचे पाणी येत आहे. इतके होत असताना खटाव तालुक्यात आंदोलनाची नाटके करणार्‍यांनी कधी कौतुकाचा शब्द काढला नाही. खटाव आणि माण तालुक्यात वाद निर्माण करून, अस्तित्व टिकवण्याची धडपड करणार्‍यांच्या बागायती शेतीला पाणी मिळतेय. शेतकर्‍यांचा खोटा कळवळा आणणारे पाण्याची चोरी करत आहेत. येरळा नदीत अनेक वेळा नेर धरणातून पाणी सोडले आहे. माणला पहिल्यांदाच फक्त 0.17 टीएमसी पाणी नेले, तर खटाववर अन्याय केल्याचे चित्र उभे केले जात आहे.

मी पाणी आणलेय याचा पोटशूळ आंदोलन करणार्‍यांना उठला आहे. मी गेल्या 11 वर्षांपासून लागेल तेव्हा पाणी आणतोय, विकासनिधीची लोकसंख्येच्या निकषावर 60 आणि 40 टक्के विभागणी करतोय. पाणी देण्यात खटावला प्राधान्य देतोय, हे जनतेने वारंवार घरी बसवलेल्यांना बघवत नाही. औंधसह 22 गावांच्या पाण्याचा विषय मी विधानसभेत मांडताच या आंदोलकांनी नाटके केली. त्या भागात पाण्याची तरतूद मी करुन घेतली आहे.