कराडला महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शन; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | पुतळा प्रकरणाचे महाविकास आघाडीचा निषेध असो, अशा घोषणा दत्त चौक दिल्या जात होत्या. मालवण मधीलछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आज जोरदार निदर्शन केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभीवादन करून आंदोलन सुरू झाले.

यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरेसह काँग्रेस नेत्यांकडून होणारे आंदोलन केवळ सत्तेसाठी नौटंकी सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी भाजपचे महामंत्री विक्रांत पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम, भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, विष्णू पाटसकर, अजय पावसकर, प्रमोद शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाविकास आघाडीसह शरद पवार, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेत्यांविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी भरत पाटील, रामकृष्ण वेताळ, अतुल भोसले, धैर्यशिल कदम यांनी भावना व्यक्त केल्या.

महाविकास आघाडीकडून सत्तेसाठी राजकारण सुरू असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याची घटना दुर्दैवी व निंदनीय आहे. मात्र केवळ सत्तेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करून राजकारण केले जात आहे. मालवण प्रकरणी गुन्हा दाखल करून काहींना अटक केली आली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई होणार आहे, अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या.