अजितदादांच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात ‘भाजप’कडूनही पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या सातारा निरीक्षकपदी बारामतीचे किशोर मासाळ यांची निवड केली व त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आता त्याच्या पाठोपाठ भाजपही तयारीला लागले असून भाजपच्या सोशल मीडिया आयटी सेलच्या सातारा जिल्हा सहसंयोजकपदी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू सहकारी कोळकी, ता. फलटण येथील सुधीर जगदाळे यांची निवड करण्यात आलेली आहे. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सोशल मीडिया प्रदेश संयोजक प्रकाशजी गाडे, प्रदेश संयोजक तेजस मालवीय, भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांच्या सूचनेनुसार जिल्हा संयोजक श्री. संजय घार्गे यांनी सोशल मीडिया आयटी सेलच्या फलटण विभागाच्या काही नियुत्या जाहीर केल्या. त्यामध्ये सुधीर जगदाळे यांची सातारा जिल्हा सहसंयोजक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तसेच फलटण मंडल संयोजकपदी संदीप जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

सध्याच्या राजकारणात सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, तसेच आयटी सेलचे काम च्या माध्यमातून पक्षाचे काम, जनकल्याणकारी योजना, पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविणे, भाजपाचे वेबपोर्टल सांभाळणे, तांत्रिक बाबी सोडवणे व भाजपाच्या लाईव्ह कार्यक्रमांचे होस्टिंग व प्रक्षेपण करणे हे आहे.