BJP ने पाटणमध्ये केली ‘कमळ’ फुलवण्याची तयारी, विक्रमबाबांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. काहींनी लोकसभेचे उमेदवार ठरवले असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अगोदर अजित पवार गटाने जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी बारामतीच्या शिलेदराची निवड केली. त्यानंतर भाजपनेही फळतांसह जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पाटण विधानसभा मतदार संघात भाजपने लक्ष घातले असून विधानसभा निवडणूक प्रमुखपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मित्र पक्ष शिंदे गटातील उमेदवार मंत्री देसाईं असताना देखील भाजपकडून विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर जबाबदारी दिल्याने अनेक प्रकारची चर्चा केली जाऊ लागली आहे.

भाजपकडून जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्याच्या निवडी केल्या जात आहे. त्यांच्या निवडी करून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. विक्रमबाबा पाटणकर यांची देखील नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतीच करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. उदयनराजे भोसले, आ. श्रीकांत भारतीय, लोकसभा संयोजक सुनील काटकर यांची देखील उपस्थिती होती.

पाटणचे विक्रमबाबा पाटणकर कोण आहेत?

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विधानसभा निवडणूक प्रमुखपदी ज्या विक्रमबाबा पाटणकर हे राष्ट्रवादीच्या विक्रमसिंयांची निवड केली आहे. ते सातारा जिल्हा परिषदेचे एकेकाळचे उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अर्थ खाते देखील होते. पाटण नगरपंचायत, पाटण पंचायत समिती, सातारा जिल्हा परिषद आणि पाटण विधानसभा अशा निवडणुकीत त्यांनी पाटणकर गटाकडून महत्वाच्या भूमिका बजावली होत्या. पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम विक्रमबाबा पाटणकर यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 2017 साली जिल्हा परिषदेचे तिकिट नाकारल्याने राष्ट्रवादीची साथ सोडली. आता खासदार उदयनराजे भोसले यांच्या पुढाकारातून आणि मध्यस्थितीने विक्रमबाबा भाजपमध्ये दाखल झाले आहेत.