कराड प्रतिनिधी । कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कृष्णा इन्स्टिटयूट ऑफ अलाईड सायन्सेस, मायक्रोबायोलॉजिस्टस सोसायटी, इंडिया व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय “बायोमेक इन इंडिया २.०” आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. दि. १९ जानेवारी रविवारपासून ते २१ जानेवारी पर्यंत ही परिषद संपन्न होणार आहे.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, आमदार डॉ. अतुल भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. परिषदेत कुलपतींचे प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, शैक्षणिक व मानांकन प्रमुख सल्लागार डॉ . प्रविण शिंगारे, कुलगुरु डॉ. सौ. नीलम मिश्रा , गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गाचे कुलगुरू डॉ . दयानंद , कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे , मायक्रोबायॉलॉजिस्टस सोसायटी, इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम . देशमुख, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स, साताराचे प्राचार्य डॉ . बी . टी . जाधव मार्गदर्शन करणार आहेत.
डाटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेची जैविक तंत्रज्ञानातील भूमिका व स्वयंउद्योजकता निर्मिती व भारतीय प्राचीन ज्ञान प्रणाली या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हा आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये भारत व भारताबाहेरून ६०० पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व शास्त्रज्ञ उपस्थित राहणार असून विविध विषयांवर व नवीन भारतीय शैक्षणिक धोरण २०२० अन्वये विविध अभ्यासक्रमांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणार आहे.
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल, बायोस्टार्टअप, उद्योजकता , प्रतिष्ठित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, बायोसर्विसेस, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, कृषी जैवतंत्रज्ञान, व्यावसायिक जैवतंत्रज्ञान इ. पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध वैज्ञानिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये पोस्टर स्पर्धा, मॉडेल मेकिंग, तसेच सामूहिक नृत्य व गायन, स्पर्धा यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन परिषदेचे कार्यवाह अधिष्ठाता व प्राचार्य डॉ . गिरीश पठाडे यांनी केले आहे.