कराड प्रतिनिधी | ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला
आरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील 200
गावांचे आज बुधवारपासून सुरू होणारे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून आजपासून चक्री उपोषण जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दुर्दैवी घटनेच्या
पार्श्वभूमीवर कराड शहरात मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू …
खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री दंगलीच्या घडलेल्या प्रकारानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 48 तासाकरीता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी आज सर्व धर्मीयांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सातारा शहर व जिल्ह्यात कलम 144 जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी देखील कडक बंदोबस्त ठेवला होता.