सातारा प्रतिनिधी । आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे. आज सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बिचुकले साक्षात शिवरायांच्या वेशभूषेत शिवतीर्थावर अवतरले. छत्रपतींच्या वेशभूषेत येऊन बिचुकलेंनी साताऱ्यात शिवतीर्थवरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बिचुकलेंनी अभिवादन केलं.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. आज साताऱ्यातील शिवतीर्थवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नतमस्तक होण्यासाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले आले. यावेळी बिचुकलेंच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी देखील संवाद साधला. “शिवरायांचे वैचारिक वारस म्हणून स्वतः कलाकार या नात्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये आलो आहे.
संपूर्ण नवीन पिढीला सांगेन की खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्व जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आणि त्या धर्तीवर स्वराज्याला अभिप्रेत असलेले संविधान विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांनी लिहिले.” असे अभिजित बिचुकले यांनी म्हंटले.