बॅग चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वाईला जाणाऱ्या मार्गावर आसले गावच्या हद्दीत प्रवाशांची बॅग जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि ०९/०७/२०२३ रोजी रात्री ८ ते ९ वा.चे सुमारास पाचवड ते वाई जाणारे रोडवर, आसले गावच्या हद्दितील पुलाजवळ एक महिला व तीन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या जवळ असणारी बॅग जबरदस्तीने हिसकावून त्यामधील दोन मोबाईल, सोन्यांचे कुंडल, सोन्याचा गुरुमनी रोख रक्कम व कागदपत्रे असा एकूण १ लाख ६७ हजार ६९९ रुपयाचा माल घेऊन पळून गेले. या प्रकारणी भुईंज पोलीस ठाण्यात गु.र.नं २६२/२०२३ भादविस कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, श्री.बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी स.पो.नि. रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक विशाल भंडारे, रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, राजेश कांबळे यांचे एक पथक तयार करण्यात आले होते.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्हा घडले ठिकाणचे आसपासचे सुमारे १५ ते २० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून तांत्रिक विश्लेषणावरुन संशयीतांचे ठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली. प्राप्त माहितीवरुन नमुद पथकातील अधिकारी/ अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उप-निरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, नाना गुरव, प्रविण फडतरे, अमित माने, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत, ओंकार यादव यांनी परखंदी, ता. वाई गावचे हद्दितून ३ संशयीतांना दि. १४/०२/२०२४ रोजी ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगीतले. आजपर्यंत झाले तपासात आरोपींचे ताब्यातुन चोरीस गेलेला मोबाईल व इतर ४ मोबाईल फोन तसेच पिवळया धातुचे ४९२ कॉईन असा एकूण ५० हजार ७०० रुपये किंमतीच मुद्देमाल हस्तगत केला आहे.

आरोपींच्या ताब्यातुन सोन्यासारखे दिसणारे बनावट सोन्याचे कॉईन जप्त करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने गुन्हयाचा तपास चालु आहे तसेच गुन्हयातील पाहिजे महिला आरोपीचा देखील शोध सुरु आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. अरुण देवकर यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखा सातारा व भुईंज पोलीस ठाण्याकडील सपोनि रमेश गर्जे, पो.उ.नि. अमित पाटील, पोउनि रत्नदिप भंडारे, पोउनि. विशाल भंडारे, पोलीस अंमलदार नितीन जाधव, शरद बेबल, प्रविण फडतरे, नाना गुरव, अमित माने, सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, गणेश कापरे, विशाल पवार, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत, ओंकार यादव यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असुन कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक सातारा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वाई यांनी अभिनंदन केले आहे.