सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कवठे गावच्या हद्दीत सुमारे 200 बकऱ्या घेऊन निघालेल्या एका गुजराती ट्रकवर भुईंज पोलिसांनी मोठी कारवाई केली. या कारवाईत ट्रकसह सुमारे 200 बकऱ्या असा 25 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी पकडून 2 जणांना ताब्यात घेतल्याची घटना शुक्रवारी घडली.
जूनेत इब्राहिम भाई गेना व सरफराज युसुफ भाई तीतोईय्या (गुजरात) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. 4 ऑगस्ट रोजी महामार्गावरून विनापरवाना व अवैधरित्या वाहतूक करून ट्रकमधून बकऱ्या दुसऱ्या राज्यात घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदरची माहिती मिळाल्यानंतर भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रत्नदीप भांडारे, पोलीस हवालदार नितीन जाधव, दगडे यांनी कवठे गावाचे हद्दीत एका हॉटेलवर उभा असलेलया ट्रक क्रमांक (GJ 31 T 5913) यामध्ये 200 बकऱ्या कोणत्याही प्रकारची काळजी न घेता तसेच प्रशासनाची परवानगी न घेता अवैध्यरित्या केरळ राज्यात निघाला होता.
या प्रकरणी ट्रक चालक जूनेत इब्राहिम भाई। गेना व सरफराज युसुफ भाई तीतोईय्या (दोघेही रा. गुजरात) यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांनी दिलेल्या माहितीनंतर ते अवैध्यरितीने वाहतूक करत असल्याचे दिसून आले. यानंतर दोघांनाही ट्रकसह पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच संबंधितांवर प्राण्यांच्या छळ प्रतीबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भुईज पोलिसांच्या या कारवाईचे सर्वस्थरातून स्वागत होत असून जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईचे उपविभागीय पोलीस अधीकारी बाळासाहेब भातचिम यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व त्यांचे टीमचे कौतुक केले आहे.