सातारा प्रतिनिधी | वडुज येथील नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे आज दि. ११ रोजी सायंकाळी 5 वाजता येथील बाजार पटांगणात भूमिपूजन समारंभ होणार आहे. आज होणाऱ्या भूमिपूजन कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भाजप आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून केंद्र शासन पुरस्कृत अमृत २० या योजने अंतर्गत शहराला ४६ कोटी ६७ लाख रूपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या कामाचे भूमीपूजन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. आमदार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक,
नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा मनिषा काळे, मुख्याधिकारी कपिल जगताप यांनी केले आहे.