कोयना वसाहतमध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन उत्साहात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कोयना वसाहत, ता. कराड येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी राज्य उत्पादनशुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई आणि कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

शिवदौलत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून कोयना वसाहत येथे मंजूर झालेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी यशराज देसाई व विनायक भोसले यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून, कोयना वसाहतीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

यावेळी सरपंच सौ. सुवर्णा वळीव, उपसरपंच उमेश कुलकर्णी, शिवाजीराव जाधव, ग्रामपंचायत सदस्य विनायक कुलकर्णी, चंद्रशेखर पाटील, सम्राट पाटील, निलेश भोपते, रजनी गुरव, सुनीता भोसले, संगीता पाटील, कुसूम पुजारी, शीतल जाधव, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनुकले, माजी उपसरपंच महेश कुलकर्णी, माजी ग्रा.पं. सदस्या सुषमा कोळेकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.