कराड प्रतिनिधी । कराड दक्षिणचे लोकप्रिय आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या फंडातून म्हसोली गावात विकासकामासाठी 7 लाख मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे भूमीपूजन राजाराम पाटील उपाध्यक्ष तंटामुक्ती म्हासोली यांचे शुभहस्ते नुकतेच पार पडले.
यावेळी सरपंच सौ.सुमती शेवाळे, सहाय्यक अभियंता स्वाती पवार, सचिव वर्षाताई कुंभार, सदस्या सौ. मनीषा पवार, सदस्य बाळकृष्ण पाटील, गौतम कांबळे, आण्णासाहेब लोहार यांची उपस्थिती होती.
यावेळी राजमाता ग्रामसंघाचे भूमीपूजन सदस्य बाळकृष्ण पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. म्हासोली येथे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विकास फंडातून अनेक विकास कामे करण्यात आलेली आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या विकासकामांमुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे.