भुजबळांकडून केल्या जात असलेल्या विरोधामागे बोलवता धनी दुसराच कोणीतरी….; आ. भास्करराव जाधव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जालना येथे ओबीसी- भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी मोठ्या जोशात मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला आणि आव्हानात्मक भाषेत टीका हे सर्व लक्षात घेता त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. भाजपचा एखादा वरिष्ठ नेता, राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री, ओबीसी नेते छगन भुजबळ यांना तुम्ही जामिनावर बाहेर आहात, याची जाणीव करून देत, दोन्ही समाजात जातीय दंगली घडतील अशी वक्तव्ये करा अथवा वर्तन करण्‍याची धमकी तर देत नसेल ना? असा संशय शिवसेनेचे (उबाठा) आ. भास्करराव जाधव यांनी व्यक्त केला.

कोरेगाव येथे आमदार भास्करराव जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भुजबळ जेव्हा मंत्री होते. तेव्हा ते असताना मंत्रिमंडळात त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करत नाही. मात्र, बाहेर आल्यानंतर अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये आरक्षणाला विरोध करत आव्हान देत आहेत, याचाच अर्थ त्यांचा बोलविता धनी कोणीतरी अन्य असावा हे नक्की. मात्र, दोन्ही समाजाने संयम राखावा. आपली डोकी थंड ठेवून आपला हक्क शांततेत मिळवावा.

स्वतःच्या विधानसभा मतदारसंघातील एक पूर्ण झालेला पूल ज्याचे स्ट्रक्चरल ऑडिट, रंगरंगोटी झालेली आहे. तो आदित्य ठाकरे यांनी बॅरिकेट बाजूला करून जनतेसाठी खुला केला यात गुन्हा काय आहे? तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याचा आम्ही निषेध करत आहोत. मात्र, हा गुन्हा म्हणजे लढवय्या नेत्यांसाठी स्टार असतो, तसा तो आदित्य ठाकरे यांच्‍यासाठीही ठरेल असे जाधव यांनी नमूद केले