सातारा प्रतिनिधी | कोयना धरणासाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेती, घरे पाण्याखाली गेली परंतु शासनाने काही लोकांना अद्याप कोणत्या ठिकाणी जागा दिलेली नाही व ज्याप्रमाणात संपादन केलेल्या जागेचा मोबदला दिलेला नाही, त्यामुळे आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही पुढील महिन्यात आंदोलन करून आमचा विजय मिळवल्या शिवाय आम्ही राहणार नाही ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. पाटणकर यांनी राज्य सरकारला दिला.
सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी जिल्ह्यातील कोयना धरणग्रस्त लोकांची बैठक नुकतीच डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली बामणोली येथे घेण्यात आली. यावेळी बैठकीत डॉ. भारत पाटणकर यांनी सरकारला थेट इशारा दिला. या बैठकीमध्ये कोयना धरणग्रस्तांची लढाई 1988 पासून सुरू झाली असून त्यामध्ये पहिल्या टप्याचा विजय मिळवला परंतु, शिल्लक राहिलेले शेकडो धरणग्रस्त कुटुंब आहेत. अशी एकुण पंधराशे ते दोन हजार धरणग्रस्त कुटुंब आहेत. धरणग्रस्तांचे पुनर्वसन आद्याप अखेर झालेले नाही, म्हणून दुसरा टप्पा 2016 साली सुरू झाला. परंतु 2016 साला नंतर आज पर्यत अनेक संघर्ष करून देखील फारसे पुढे जाऊ शकलो नाही, अशी भावना धरणग्रस्तांनी बैठकीवेळी व्यक्त केली.
आज जमीन वाटप सूरू होणे अपेक्षीत होते. परंतु एक सरकार आले ते ही पडले आणि जे दूसरे सरकार आले ते लक्ष देत नाही. काही गोष्टी पहिल्या सरकार ने आर्धावट ठेवलेल्या आहेत. आशा वेळेला आम्हाला आचार संहितेच्या आधी जमीनीचे वाटप सुरू झाले पाहिजे, व निवडणूक कालावधी मध्ये कोणत्याही आचार संहितेचा आडथळ न आणता वाटप करावे. असा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आले असून सदर बैठकीवेळी कोयना धरणग्रस्त मोठया संख्येने उपस्थित होते.
आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही : डॉ. भारत पाटणकर
आम्ही लढा करू”लढा करत असताना सरकारला आमचा इशारा आहे, की आम्ही पुन्हा गप्प बसू शकत नाही. तुम्ही आमचे कोणी नाही किंवा आम्ही तुमचे कोणी नाही, या पध्दतीने आम्ही अंदोलन करून आमचा विजय मिळवल्या शिवाय आम्ही राहणार नाही. असा संघर्ष ऑगस्ट महिन्यापासून करण्याचा र्निधार आजच्या बैठकीमध्ये केलेला असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष
डॉ.भारत पाटणकर यांनी ‘हॅलो महाराष्ट्र‘ शी बोलताना दिली.