जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरी द्वारा ऊस लागवड करणार : भाग्यश्री फरांदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ऊसाच्या विक्रमी उत्पादनासाठी जिल्ह्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रावर सुपर केन नर्सरी द्वारा ऊस लागवड करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे निवृत्त शास्त्रज्ञ व सुपरकेन नर्सरी चे जनक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी युवराज काटे, रीजनल मॅनेजर विजय आगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

भाग्यश्री फरांदे म्हणाल्या की, ” उसाच्या वाढत्या लागवडीकरिता तयार रोपांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऊस रोपांचा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःच्या मातीत आणि स्वतःच्या शेतात सुपर केन नर्सरी तयार करून उत्पादनात वाढ करावी.

यासाठी कृषी विभाग तांत्रिक मार्गदर्शन आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून अतिरिक्त कर्ज पुरवठा करणार आहे. निसराळे गावात शेतकऱ्यांनी 50 हेक्टर क्षेत्रावर सुपरकेन नर्सरी केली आहे ती कौतुकास्पद बाब असून इतर गावांनी त्यांचा आदर्श घ्यावा

या कार्यक्रमांमध्ये सुपरकेन नर्सरीचे जनक डॉ बाळकृष्ण जन्मदग्नी यांनी सुपरकेन नर्सरीच्या तांत्रिक बाबी विषयी मार्गदर्शन केले. नितीन जाधव यांनी ऊस उत्पादन वाढीमध्ये ठिबक सिंचनाचे महत्त्व विषद केले. विपुल मोरे यांनी शेतीमध्ये मजूर टंचाईवर उपाय यांत्रिक औजरांचा वापराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी एक रुपयात पिक विमा कॅम्प कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास मंडल कृषी अधिकारी नितीन पवार, कृषी पर्यवेक्षक अनिल यादव, रोहिदास तीटकारे, सरपंच नारायण खामकर, उपसरपंच सुशीला घोरपडे, कृषी मित्र शेतकरी गटाचे अध्यक्ष श्रीमंत घोरपडे, सुरेश घोरपडे, महेश घोरपडे, हणमंत कणसे, पंढरीनाथ घोरपडे, अधिक रंधवे, राजेंद्र जाधव, कृषी सहाय्यक प्रशांत गायकवाड, डी, के. पवार, सचिन कांबळे, रवी पवार, दया कांबळे, सुनीता पोतेकर, शेतकरी उपस्थित होते. कृषी सहाय्यक अंकुश सोनावले यांनी सूत्रसंचालन केले. विकास सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र देशमुख यांनी आभार मानले.