सातारा प्रतिनिधी | ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (Bhagwanrao Gore) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. मागील काही दिवस त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते.
भगवानराव गोरे यांची आज पहाटे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात सुपुत्र अंकुश, जयकुमार, शेखर, कन्या सौ. सुरेखा, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंतिम दर्शन आज, मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:०० ते ४:०० वाजेपर्यंत त्यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी होणार आहे. मान तालुक्यातील बोराटवाडी येथे दुपारी ४ वाजता अंत्यविधी होणार आहे.
दरम्यान, जयकुमार गोरे यांनी फेसबुक पोस्ट करीत याबाबत माहिती दिली आहे. भगवानराव गोरे यांच्या निधनाने मान तालुक्यात शोककळा पसरली आहे.