सातारा प्रतिनिधी । सातारा येथील श्री. ज्योतिर्मय फाउंडेशनच्या वतीने नुकताच महिलांचा सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी उपस्थिती लावली होती. “शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व त्या यशस्वी करण्यासाठी महिलांच्या विविध गटांनी सहकार्य करावे. त्यांनी शासकीय योजनांला लाभ घेण्यासाठी पुढे यावे,” अशी अपेक्षा जिल्हा कृषी अधीक्षक फरांदे यांनी यावेळी व्यक्त केली.
सातारा येथे पार पडलेल्या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक संतोष हराळे, दिग्विजय पाटील, राजेश मिरजकर, बलभीम महाडिक, चित्रलेखा माने, श्रीकृष्ण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुवर्णाताई पाटील म्हणाल्या की, ‘फाउंडेशनचे रोपटे आता वटवृक्ष होत असताना खूप आनंद होत आहे. महिलांना सक्षम करणे या कार्यामध्ये सर्वांची मोलाची साथ लाभत आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषी मक्तेदारी मोडीत काढून महिला पुढे येत आहेत. हे फाउंडेशनचे मिळालेले यश आहे.’
यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमास सातारा, वाई, जावळी महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव, खटाव माण, महाबळेश्वर, कराड, पाटण या परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मेळावा यशस्वी करण्यासाठी संगीता वेंदे, संगीता घोरपडे, जगन्नाथ मेहत्रे, अरविंद चव्हाण, स्वाती जाधव यांनी परिश्रम घेतले.