जिल्हयातील लाभार्थी कार्डधारकांना 31 ऑगस्टपर्यंत मिळणार जुलैचे रखडलेले रेशनधान्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | अन्नधान्य वितरणासाठीच्या सर्व्हरमधील समस्या अद्यापही कायम असल्याने जुलैतील धान्यवाटप शिल्लक राहिले आहे. या धान्य वाटपास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

यापूर्वी ही मुदत 15 ऑगस्टपर्यंतच होती. २२ जुलैपासून सर्व्हरमधील तांत्रिक दोषामुळे पाॅज मशीनवर पावत्या निघत नव्हत्या. या अडचणीमुळे दुकानात धान्य असूनही दुकानदार ग्राहकांना धान्य देऊ शकत नव्हते. ग्राहकांना रांगेमध्ये तासनतास उभे राहवे लागत होते. परंतु, सर्व्हर समस्येमुळे पॉज मशीन चालत नव्हते. या सर्व त्रासामुळे ग्राहक वैतागून दुकानदारांना दोष देत होते.

यामध्ये दुकानदारांचा कुठलाही दोष नसताना ग्राहकांचा रोष ओढवत होता. या सर्व गोष्टीस वैतागून राज्य संघटनेच्या निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात तेथील तहसीलदारांना सर्व्हर समस्येबाबत 5 ऑगस्ट रोजी निवेदन देण्याचे ठरवले होते. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी निवेदन दिले. या आंदोलनावेळी दुकानदारांनी प्रतिकात्मक ई पॉज मशीन जमा केले. आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सर्व दुकानदार सहभागी झाले होते.

धान्य वाटपास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने दुकानदारांनी समाधान व्यक्त केले. या मुदतवाडीमुळे उरलेल्या ग्राहकांना जुलैचे धान्य वाटप करता येणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 1715 धान्य दुकानदार असून एकूण 4,22,317 लाभार्थी कार्डधारक आहेत.