मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते म्हणणाऱ्या जरांगेबाबत ‘या’ आमदाराने केला गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागेवर उमेदवार देणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीसह महाविकास आघाडीचेही टेन्शन वाढलं आहे. एकीकडे जरांगे पाटील रोज सरकारला आव्हान देत असतानाच आता बार्शीच्या आमदारांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

“मी माझ्या देवाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची, माझ्या आई-वडिलांची शपथ घेऊन सांगतो. मी फुकलो असतो तरी उदयनराजे पडले असते,” हे विधान तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवांनो मनोज जरांगेंनी केलं आहे. त्यावेळी मला मोठा धक्का बसला असल्याचे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हंटले.

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, आम्ही मराठा आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठकीला बसलो होतो. याच बैठकीत उदयनराजांचा विषय निघाला. त्यावेळी मनोज जरांगे यांनी उदयनराजे थोडक्या मतांनी निवडून आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. त्या घटनेवरसुद्धा काही अंशी चालावं लागणार आहे.काही कोर्टकचेरी करावी लागणार आहे. मराठा-ओबीसी एक असेल तर आपण हायकोर्टात याचिका दाखल करु. डायरेक्शन मागू. त्याप्रमाणे तो प्रश्न आपण सोडवू. कितीही पैसे लागायचे ते सांगा. कोणी नाही दिले तर मी बघतो. बांधवांनो, ही माझी भाषा आहे असेही राऊत म्हणाले.