ग्राम स्वच्छता अभियानात बनवडी ग्रामपंचायत पुणे विभागात प्रथम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील बनवडी ग्रामपंचायतीने शासनाच्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गावाचे काैतुक केले आहे.

कराड तालुक्यातील बनवडी येथील घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. आता पर्यंत सातारा जिल्ह्यातील अनेक गावांनी आणि राज्यातील अनेक जिल्ह्यातील टीमने या प्रकल्पास भेट दिली आहे. या प्रकल्पाचा आदर्श अनेक गावांनी घेतला आहे. याच गावातील गांडूळ खतापासून या ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. तसेच चोवीस बाय सात पाणीपुरवठा योजना सौर उर्जेद्वारे चालते हे विशेष आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात ग्रामपंचायतीने केलेल्या कामगीरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी विजय विभुते आदींनी काैतुक केले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी खिलारी यांनी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच नरहरी जानराव, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांचे अभिनंदन केले आहे.