कराड प्रतिनिधी । ऊस दरासाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मंगळवारी कराड येथील तहसील कार्यालयात जाऊन उद्या दि. ९ रोजी खर्डा भाकरी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांना इशाऱ्याचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष गणेश दादा शेवाळे, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, राष्ट्रीय समाज पक्षाचे महेश जीरांगे, बळीराजा कराड तालुका अध्यक्ष आनंदराव थोरात व बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तहसीलदारांना दिले निवेदनातं म्हंटले आहे की, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व ऊसदरासाठी आंदोलनाची सुरुवात म्हणून कराड तहसीलदार ऑफिसच्या समोर उद्या खर्डा भाकरी आंदोलनाची सुरुवात केली जाणार आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी नऊ वाजता कराड तहसील ऑफिस समोर ऊसदरासाठी आंदोलनाचा भाग म्हणून खर्डा भाकरी खाऊन राज्य सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार आहे.