कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनात आमदारांच्या मतदार संघातील प्रस्तावित असलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड उत्तर विधानसभा मतदार संघात भाजप नेत्यांकडून अनेक विकास कामे आम्हीच मंजूर करून आणल्याचे सांगितले गेले असल्याने यावर आमदार बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अर्थसंकल्पातून मतदार संघातील 32 कामांसाठी 27 कोटी 32 लाखांची रस्ते व पुलाची विकासकामे मंजूर करून आणली आहेत. मात्र, काही जणांकडून जाणीवपूर्वक मतदार संघात आम्ही काही विकास कामे मंजूर केल्याची वल्गना केली जात आहे. हे बरोबर नसल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
आमदार बाळासाहेब पाटील यांनी आज कराडात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कराड उत्तर मतदार संघात मंजूर केलेल्या विकासकामांची थेट यादीच दिली. सुमारे 32 कामांसाठी 27 कोटी 32 लाखांच्या विकासकामांची यादी दाखवत त्यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला. आमदार पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणूक जवळ आली की काहीजण उठून विकास कामांचे श्रेय घेण्याचे काम करतात. आम्हीच विकासकामे मंजूर केल्याचे सांगत नारळ देखील फोडतात. मात्र, नंतर विकासकामे झाली नाही तर जनता आम्हाला जाब विचारते. अशा गोष्टींचा आम्हाला अनेकदा त्रासही सहन करावा लगला आहे.
सध्या कराड मतदार संघात मी मंजूर केलेल्या विकासकामांच्या यादीत व काही जणांनी मंजूर करून आणलेल्या विकास कामांच्या यादीत तफावत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक यामध्ये यशवंतनगर गाडीतळ ते मसूर-श्रीवडे रस्ता सुधारणेसाठी आम्ही 30 लाख रुपये मंजूर करून आणले आहेत. मात्र, हेही काम संबंधितांच्या यादीमध्ये दिसत आहे. याबाबत अधिक माहिती घेणार आहे. मात्र, माझ्या मतदार संघात काही कामांना कमी निधी तर काही कामांना जास्त निधी देण्यात आला आहे. याची माहिती लवकरच घेणार असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
हिंमत असेल पुरावे घेऊन कराडच्या दत्त चौकात या…
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात विकासकामे आम्हीच मंजूर करून आणल्याचे भाजप जिल्ह्यातील नेत्यांकडून सांगितले आहे. यावर त्यांना कराड उत्तर तालुका अध्यक्ष प्रशांत यादव थेट आव्हान दिले आहे. तुमच्यात हिंमत असेल तर कराडच्या दत्त चौकात येऊन मंजूर करून आणलेल्या विकास कामाची यादी व पुरावे सादर करावे, असे यादव यांनी पत्रकार परिषदेवेळी म्हंटले.
मंजूर केलेल्या विकास कामाची यादी पुढीलप्रमाणे :
१).खंडाळा-कोरेगांव-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ९१/७०० ते ९४/०० (भाग-मसूर ते शहापूर फाटा) रस्त्याचे चौपदरीकरणासह सुधारणा करणे २ कोटी २० लाख. २).सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार-आवी नागझरी रस्ता प्रजिमा ३५ कि.मी. २२/५०० ते २५/०० (भाग-वाठार ते इंगळे वस्ती) चे रूंदीकरण व सुधारणा करणे ता. कोरेगांव ३ कोटी ३).खंडाळा-कोरेगांव- रहिमतपूर-कराड-सांगली-शिरोळ रस्ता रा.मा. १४२ कि.मी. ७१/०० ते ७३/५०० (भाग-बोरगांव ते किरोली) रस्त्याचे रूंदीकरण व सुधारणा करणे ता कोरेगांव ३ कोटी. ४).प्रजिमा-५७ ते शिरगाव-पेरले-खराडे-हेळगांव-पाड ळी-रहिमतपूर रस्ता प्रजिमा-३९ कि.मी.५/०० ते ७/७०० (भाग-रा.म.४ ते पेरले ते कृष्णा नदी पुलापर्यंत) रस्त्याचे मजबुतीकरण व सुधारणा करणे २ कोटी ५० लाख. ५).सासपडे-निसराळे-तारगांव-वाठार- आर्वी-नागझरी रस्ता प्रजिमा ३५ कि.मी.१६/०० ते १७/५०० (भाग-तारगांव पूल ते तारगांव रेल्वे स्टेशन) चे रूंदीकरण व सुधारणा करणे ता. कोरेगांव २कोटी, ६).रामा.१२४ ते लाडेगांव- वांझोळी-भूषणगड- शेनवडी-म्हासुर्णे ते रामा. १४३ रस्ता प्रजिमा १०२ कि.मी.३/५०० ते ६/०० (भाग-लाडेगांव ते वांझोळी) रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ता. खटाव.२५०.
७). मांडवे पाडळी नागठाणे बोरगांव-अपशिंगे-नांदगांव प्रजिमा ३२ कि.मी. ११/०० ते १३/०५० (भाग -बोरगाव ते वाघ वस्ती) ची सुधारणा करणे १३०.८). पाटण मणदुरे-पाल काशीळ रस्ता रा.मा. ३९८ कि.मी. ३८/०५० ३८/१०० मधील मोठ्या उंच जीर्ण पुलाची पुनर्बांधणी करणे २००..९). रा.मा. १४३ ते अंतवडी रस्ता ग्रा.मा. ६९ सुधारणा करणे ३० लाख. १०) यशवंत नगर गाडी तळ ते मसूर-शिरवडे रस्ता ग्रा.मा. ७३ सुधारणा करणे ३० लाख.११). शामगाव ते वांग रेटरे ते पाचुंद रस्ता ग्रा.मा.६७ (भाग-वांग रेठरे ते पाचूद) सुधारणा करणे २० लाख.१२) तासवडे ते वराडे रस्ता ग्रा.मा.७७ सुधारणा करणे ३० लाख. १३.सयापुर जोडरस्ता ग्रा.मा. १२६ सुधारणा करणे.१४. करवडी ते आरफळ कॉलनी रस्ता ग्रा. मा. ११६ सुधारणा करणे ३० लाख.
१५). रा.मा.१३६ ते विरवडे-करवडी रस्ता प्रा.मा. १९८ (भाग-गणपती एम.एस.ई.बी. चौक) सुधारणा करणे ता. कराड ५१ लाख. १६) पाल ते खंडाईत खाली ते अतित रस्ता प्रा.मा.३ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख. १७ धारवाडी से पाल रस्ता ग्रा.मा. ४ सुधारणा करणे ता. कराड २५ लाख १८).प्रजिमा ६० ते चोरजवाडी-मस्करवाडी ते साखरवाडी रस्ता ग्रा.मा.८ सुधारणा करणे ३० लाख.१९).किवळ ते घोलपवाडी रस्ता ग्रा.मा.२९ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख.२०).पाडळी ते गायकवाडवाडी रस्ता ग्रा.मा. २८ सुधारणा करणे ता. कराड ३० लाख.२१).रा.म.४ ते कोटी ते जुने गावठाण रस्ता ग्रा.मा.३८ सुधारणा करणे ता. कराड २५ लाख.
२२). साखरवाडी ते जंगलवाडी रस्ता ग्रा.मा. ४७ सुधारणा करणे ता. कराड३० लाख.२३) अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता ग्रा.मा. १३६ सुधारणा करणे ता. कोरेगांव.३०लाख.२४).रा.मा. १४२ ते बोरबन रस्ता ग्रा.मा. १३९ सुधारणा करणे ता.कोरेगांव.२०लाख.२५.रा.मा. १४० ते साप वेळू जोडरस्ता ग्रा.मा. १५४ सुधारणा करणे ता.कोरेगांव. २०.००लाख.२६).रा.मा. १४२ ते टकले अॅप्रोच रस्ता ग्रा.मा. १६६ सुधारणा करणे ता.कोरेगांव. २० लाख. २७). तारगांव ते टकले रस्ता ग्रा.मा. १७७ सुधारणा करणे ता.कोरेगांव.२० लाख.२८) आर्वी-पिंपरी-सुली-बोरगांव रस्ता इजिमा.८८ (भाग-पिंपरी ते सुली) ची सुधारणा करणे २० लाख.२९).कालगांव-खराडे-कवठे-कोणेगा व रस्ता प्रजिमा-८३ कि.मी.१०/७०० ते १३/७०० (भाग- मसूर रेल्वे स्टेशन ते कोणेगांव) चे मजबूतीकरण व डांबरीकरण करणे ता. कराड २००लाख.
कराड-उत्तर मधील सि.काँ. बंधाऱ्यांसाठी रक्कम रूपये १ कोटी १७ लाख मंजूर..
आ. बाळासाहेब पाटील यांचे विशेष प्रयत्नाने जिल्हा वार्षीक योजना सन २०२२-२३ मधून मृद व जलसंधारण विभागाकडील सि.काँ. बंधारा बांधणे या योजनेमधून खालील गावांमधील कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून सदरची कामे निविदास्थरावर आहेत. या बंधाऱ्यांच्या कामांमुळे संबंधीत गावांमधील शेती सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्याच्या योजनांना त्याचा लाभ होणार आहे. १). किवळ ता. कराड येथे सिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे. ४३.२२ लाख,२).मांडवे ता.जि.सातारा येथे सिमेंट कॉंक्रीट बंधारा बांधणे. ३६.९५ लाख. ३).पाडळी ता.जि.सातारा येथील (भटीचा ओढा) येथे सिमेंट काँक्रीट बंधारा बांधणे ३६.४८ लाख