जनावरे वाहतूक करणारा ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फोडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जालना येथून अंगापूर येथे गोशाळेस जनावरे घेऊन जाणारे ट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाढे फाटा ते खेड फाटा दरम्यान अडवले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी एका ट्रकची तोडफोड केली. तोडफोडीच्या घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

अंगापूर येथे असणार्‍या गोशाळेस जालना येथून जनावरे आणण्यात आली होती. यात एकूण पाच ट्रक होते. त्यातील दोन ट्रक हे सातारच्या हद्दीत सायंकाळी 6 च्या सुमारास दाखल झाले. संबंधित ट्रक हे वाढे फाटा ते खेड फाटा यादरम्यान असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ते थांबवले. ट्रकमध्ये जनावरे वाहतूक सुरू असल्याने वाहतूक करणार्‍या वाहन चालकाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारले. त्यावर या चालकाने उलट उत्तरे दिल्यामुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत (एमएच 12 जेएफ 2828) हा ट्रक फोडला.

यावेळी महामार्गावर ट्रॅफिक जाम होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. थोड्या वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर हा तणाव निवळला व वाहतूक सुरळीत झाली.