कराड प्रतिनिधी | सामाजिक क्षेत्रात अग्रेसर रोटरी क्लब नेहमी अग्रेसर असते. या संस्थेची वर्ष 2023-24 साठी नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडच्या अध्यक्षपदी श्री. बद्रीनाथ धस्के आणि सेक्रेटरी पदी श्री शिवराज माने यांची नुकतीच निवड झाली करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कराडच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही करण्यात आल्या. त्यामध्ये रोटरी क्लब ऑफ कराडच्या व्हाईस प्रेसिडेंटपदी श्री. जगदीश वाघ, जॉईंट सेक्रेटरीपदी श्री. दत्तात्रय कलबुर्गी, ट्रेजररपदी श्री. किरण जाधव, क्लब ट्रेनर म्हणून श्री. चंद्रकुमार डांगे आणि पुढील वर्षाचे प्रेसिडेंटपदी श्री. रघुनाथ डूबल यांची सार्जंट ॲट आर्म म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यावर्षीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रो. स्वाती हरकल यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक काम होणार आहे. या जिल्ह्यातमध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये जवळपास 91 क्लब येतात. यावेळी नूतन अध्यक्ष श्री. बद्रीनाथ धस्के म्हणाले की, रोटरी क्लब ऑफ कराडचे हे 67 वे वर्ष आहे. आज अखेर रोटरी क्लब कराडने कराड आणि कराडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारची सामाजिक कामे केलेली आहेत.
यावर्षी ‘अनेमिया फ्री इंडिया’ जो ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर आधारित असा प्रकल्प आहे. याचे प्रकल्पचे चेअरमन श्री. आनंदा थोरात असणार आहेत. तसेच क्वालिटी लाईफ थ्रू माईंड मॅनेजमेंट हा कॉलेजमधील तरुण आणि तरुणींसाठी संपूर्ण कराडमध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये हा प्रकल्प राबवणार आहोत. या प्रकल्पाचे चेअरमन श्री. शिवराज माने आहेत. तसेच यावर्षी रोटरी च्या या 7 फोकस एरियावर काम होणार आहे. ज्यामध्ये शांतता आणि संघर्ष प्रतिबंध, रोग प्रतिबंध आणि उपचार, पाणी आणि स्वच्छता, माता आणि बाळाचे आरोग्य, मूलभूत शिक्षण आणि साक्षरता, आर्थिक आणि समुदाय विकास आणि निसर्गाचे संगोपन यांचा समावेश आहे.