बच्चू कडूंचा विधान सभेसाठीचा पहिला उमेदवार ठरला; सातारा जिल्ह्यातून ‘या’ नेत्याला दिली संधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. आता विधानसभा निवडणुक जवळ आल्यामुळे त्याच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या पक्षात प्रहार संघटना देखील मागे नाही. कारण प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार हे लोकसभा निवडणुकीनंतर आक्रमक बाणा घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांनी महायुती सरकारमध्ये असतानाही भाजपसह, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाविरोधात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी पहिला उमेदवाराच्या नावाची घोषणा नुकतीच केली असून आहे. कडू यांनी सातारा जिल्ह्यातील माण खटावमधून अरविंद पिसे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

बच्चू कडू यांनी सातारा जिल्ह्यातील माण खटावमधून अरविंद पिसे यांना उमेदवारी घोषित केली असून त्यांच्या या घोषणेनंतर सातारा जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या आमदार आणि नेत्याविरोधात पिसे यांना मैदानात उतरवण्याची तयारी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. प्रहार जनशक्ति पक्ष हा सर्व सामान्य जनतेचा, शेतकरीवर्गाचा व सर्व दिव्यांगाचा आहे. यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पक्ष नेहमीच आग्रही राहिला आहे.

या पक्षाची वेगळी अशी ताकत असल्यानेच आगामी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ति पक्ष हा राज्यातील काही जागा लढवणार हे नक्की. त्याच सर्वप्रथम सुरुवात सातारा जिल्ह्यातील माण – खटाव विधानसभा मतदार संघापासून झाली आहे.

प्रहार’चे अरविंद पिसे आहेत तरी कोण?

प्रहार जनशक्ति पक्षाचे उमेदवार म्हणुन जाहीर झालेले एकमेव उमेदवार हे अरविंद पिसे हे आहेत. अरविंद पिसे हे पेशाने एक इंजिनियर असुन त्यांचे गत ७ वर्षापासुन माण-खटावमध्ये सोशल इंजिनियरिंग सुरु आहे. त्यांचे सामाजिक काम पाहुनच प्रहार जनशक्ति पक्षाचे प्रमुख आ. बच्चु कडु यांनी त्यांच्यावर सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. पिसे यांनी ही जबाबदारी संभाळताना प्रहार पक्षाची ताकत माण – खटावमध्ये वाढवण्यास सुरुवात केली आहे. समाजातील निराधार, दिव्यांग, बांधकाम मजुर, विद्यार्थीवर्ग यांच्यासाठी त्यांचे काम आजही जोमाने सुरु आहे.