माणमधील कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीबाबत ‘प्रहार’च्या बच्चू कडूंनी केली मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | दहिवडी येथे आमदार बच्चू कडू यांची नुकतीच जाहीर सभा पार पडली. अपंग, दिव्यांग विधवा बांधव सहभागी झाले होते. या सभेत आमदार बच्चू कडू यांनी प्रहार माण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. ‘आम्ही युती करत नाही. आमची युती जनतेसोबत आहे. या मतदारसंघात आम्ही पक्के ठरवले आहे. माण- खटाव मतदारसंघातून खात्रीने सांगतो, 120 टक्के निवडणूक आम्ही लढवणार आहोत, असे कडू यांनी म्हंटले.

यावेळी खटाव तालुका अध्यक्ष सागर देवकर, संपर्कप्रमुख गणेश सातपुते, उपसंपर्कप्रमुख शरद गायकवाड, वडूज शहराध्यक्ष प्रमोद पावडे, मांडवे गावचे सोसायटी संचालक व प्रहार जनशक्ती पक्ष अपंगमित्र अशोक देशमुख, माण तालुका अध्यक्ष नंदकिशोर पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख अतिश माने, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नाथा शिंदे अमोल कारंडे आदीची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार कडू म्हणाले की, माण खटाव तालुक्यामध्ये सुमारे 28 हजार मतदार हे दिव्यांग आहेत आणि ते आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही”.

सरकार शेतकऱ्याला मदत द्यायला अपयशी ठरले, त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. पूर्वी नोकरीवाल्याला कोण पोरगी देत नव्हतं. त्यावेळी शेतकऱ्यांला पोरगी दिली जात होती. आता आता शेतकऱ्याला इतका खालच्या दर्जात नेऊन ठेवले आहे. तेथे काम करताना आत्महत्या होत आहेत. आंदोलने होत आहेत. प्रत्येक वर्षी आंदाेलने करण्यापेक्षा यावर कायमस्वरुपी तोडगा निघाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याला आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. मतदारसंघात दिला जाणारा उमेदवार हा सर्वसामान्य जनतेला असून, तो चांगले आव्हान उभे करेल’, असा विश्वास कडूंनी व्यक्त केला.