सातारा प्रतिनिधी | पोलीस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत असणाऱ्या संभाजी सुदाम बनसोडे यांना ३० वर्षांच्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. त्यांना जाहीर झालेले राष्ट्रपती पदक राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
बनसोडे हे १९९० साली शिपाई म्हणून पोलीस दलात भरती झाले होते. राष्ट्रपती पदकाने त्यांचा सन्मान झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलातून बनसाडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सातारा जिल्हा पोलीस दलात शिपाई पदावर १९९० मध्ये भरती झालेले संभाजी बनसोडे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली. सध्या ते जिल्हा विशेष शाखेत उपनिरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय, जिल्हा विशेष शाखा, पाचगणी पोलीस ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात उल्लेखनिय सेवा बजाविली आहे. यात जिल्हा विशेष शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील त्यांचे काम विशेष उल्लेखनीय राहिले.
आज पर्यंतच्या सेवाकाळातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांना ३८० बक्षिसे मिळालेली आहेत. २०१६ मध्ये त्यांचा पोलीस महासंचालक पदकाने देखील प्राप्त सन्मान झाला आहे. २०२२ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींकडून पोलीस पदक जाहीर झाले होते. राज्यपालाच्या च्या हस्ते राजभवनातील दरबार हॉलमध्ये बनसोडेंना पदक प्रदान करण्यात आले. या सन्मानाबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) सबनीस यांनी बनसाडे यांचे अभिनंदन केले.