गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनंतर कराड विमानतळावर देवेंद्र फडणवीसांच्याही साहित्याची तपासणी, ‘ही’ वस्तू देखील पाहिली उघडून

Karad News 20241115 222015 0000

कराड प्रतिनिधी | फक्त विरोधी नेत्यांच्याच साहित्याची तपासणी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्यानंतर निवडणूक यंत्रणेनं सत्ताधाऱ्यांच्याही साहित्याची तपासणी सुरू केली आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगा, साहित्याची शुक्रवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानात असलेल्या पिशवीतील डबाही उघडून पाहण्यात … Read more

जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांच्या दळणवळणासाठी 449 ‘लालपरी’ सहभागी होणार

Satara News 58

सातारा प्रतिनिधी । देश, राज्याच्या कारभारात मतदान हा महत्त्वाचा भाग मानला जातो. लोकशाहीचा हा उत्सव बुधवार, दि. २० रोजी साजरा होणार आहे. या उत्सवात सातारा जिल्ह्यातील निवडणूक कर्मचारी, यंत्रणांची ने- आण करण्यासाठी तब्बल ४४९ ‘लालपरी’ सहभागी होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी मागणी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे नोंदविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा, वाई, फलटण, … Read more

निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । भारत निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणूक २०२४ साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज (ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल) दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे. या … Read more

पृथ्वीराजबाबा विधानसभेचं मटेरियल नाही ते तर…; कराडात देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी

Karad News 36

कराड प्रतिनिधी । पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. ते विधानसभेचे मटेरिअल नाहीत ते तर आंतरराष्ट्रीय मटेरियल आहेत. तुम्ही त्यांना इथंच अडवून ठेवताय. विधानसभेचं विधानसभेचं.. विधानसभेचं. आता तरुण, उमदर, जनतेत राहणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असणारा असा आमदार दिला पाहिजे ना. कोणत्याही पदावर नसताना अतुल भोसलेंनी विकासकामे मंजूर करून आणली. मात्र पृथ्वीराजबाबांनी मुख्यमंत्री असताना एक … Read more

जमाना डिजिटल, तरीही प्रचारात रिक्षाचा रुबाब कायम; दररोज 1500 रुपये भाडे

Satara News 56

सातारा प्रतिनिधी | निवडणूक प्रचारात कमी वेळेत सर्व मतदारांच्या दारात पोहोचणे शक्यच नसते. अशावेळी अधिकाधिक मतदारांच्या कानावर उमेदवाराचे नाव, त्याचे कार्य आणि चिन्ह याची माहिती पडण्यासाठी रिक्षा फिरवणे आवश्यक ठरते. डिजिटल युगातही रिक्षातून पुकारा करत होणारा प्रचार सर्वच उमेदवारांना हवासा वाटतो. गेल्या २५ ते ३० वर्षांपूर्वी एखाद्या गोष्टीची जाहिरात करायची असेल किंवा प्रसार करायचा असेल, … Read more

शासनाचा मोठा निर्णय; 20 नोव्हेंबरपर्यंत शाळा राहणार बंद पण… असा होणार शिक्षकांवर परिणाम

Satara News 55

सातारा प्रतिनिधी | राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत अशा शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे. शासनाने राज्यातील शाळांना दि. 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, … Read more

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात एकूण 356 मतदान केंद्रांची उभारणी – निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण

Karad North News

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 55 हजार 359 पुरुष, 1 लाख 50 हजार 837 स्त्री व इतर 7 मतदार असे एकूण 3 लाख 6 हजार 203 मतदार आहेत. त्यापैकी 2 हजार 235 सैनिक मतदार असून सर्व मतदारांची मतदान ओळखपत्रे फोटो सहीत उपलब्ध झाली आहेत. एकूण 356 मतदान केंद्रे कराड उत्तर … Read more

कराड उत्तरेत पालीचा खंडोबा कुणाला पावणार? सहाव्यांदा रिंगणात उतरलेल्या बाळासाहेबांसमोर ‘मनोधैर्य’चे तगडे आव्हान

Political News 1

कराड प्रतिनिधी । सध्या २०२४ मधील विधानसभा निवडणूक हि अटीतटीची असून सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघात नऊ आमदार निवडणूक लढवत असून निवडणुकीत कुणाच्या अंगांवर विजयाचा गुलाल पडणार आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून बाळासाहेब पाटील सहाव्यांदा निवडणूक लढवत आहेत तर, त्यांच्या … Read more

म्हासोलीतील 102 वर्षीय पारुबाई आजीनी बजावला मतदानाचा हक्क; कराड दक्षिण, उत्तरमधील 577 ज्येष्ठांचे घरातूनच मतदान

Karad News 16

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. त्याअंतर्गत ८५ वर्षांवरील, दिव्यांग आणि अंध मतदारांसाठी निवडणूक आयोगाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कराड दक्षिण मतदारसंघात ८५ वर्षांवरील ३ हजार ५२४, तर कराड उत्तरमध्ये ४ हजार ९५ मतदार आहेत. त्यापैकी दक्षिणमधील ३३०, तर उत्तरमधील २४७ मतदारांचे १३ ते १५ … Read more

बामणोलीत चक्क अधिकाऱ्यांकडून बोट रॅलीच्या माध्यमातून मतदान जागृती

Phaltan News 20241115 080449 0000

सातारा प्रतिनिधी | कोयना प्रकल्पाच्या शिवसागर जलाशयातून बामणोली येथून तेटली या ठिकाणापर्यंत बोट रॅली काढून मतदान जागृती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत दुर्गम विभागातील मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून विविध कार्यालयांच्यावतीने जनजागृती मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत बामणोली येथे आयोजन करण्यात आले होते. बामणोली येथे मानवी साखळीच्या माध्यमातून व बोट … Read more

वाहने आडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; टोळीत कराड, माणमधील आरोपींचा समावेश

Phaltan News 20241114 202855 0000

सातारा प्रतिनिधी | मोहोळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकाला बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यातील स्टाफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, माण … Read more

मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सुविधा उपलब्ध करा : निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले

Phaltan News 2

सातारा प्रतिनिधी | फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना सर्व सुविधा म्हणजेच पिण्याचे पाणी, टॉयलेट्स, स्वच्छतागृहांची स्वच्छता, प्रथमोपचार यंत्रणा, सुरळीत विद्युत पुरवठा, आवश्यक असणाऱ्या मतदारांना रिक्षा, व्हील चेअर उपलब्ध करून द्यावेत अशी सूचना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत. फलटण … Read more