देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; कार कालव्यात पलटी होऊन चारजण जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Crime News 20241118 112759 0000

सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. … Read more

“हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे”; मसूरच्या सभेत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

Karad News 20241118 100018 0000

कराड प्रतिनिधी | “देशातील योजनांचा लाभ सर्वांसाठी, सुरक्षा सर्वांसाठी देणार मात्र तुष्टीकरण कोणाचेही होणार नाही. हेच उद्दिष्ट घेऊन राज्यातील महायुतीच्या सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केला आहे. त्याला सर्वांची साथ अपेक्षित आहे, त्यामुळे सामान्यांनी नवे राज्य घडविण्याच्या संकल्पात सहभागी व्हावे. हम बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, असे आवाहन … Read more

जिल्ह्यात प्रचाराच्या 728 अधिक वाहनांना RTO कडून परवानगी

Satara News 20241117 205932 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या जिल्ह्यातील ७२८ पेक्षा अधिक वाहनांना सातारा, कराड व फलटण आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक वाहनांची तपासणी कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, वाई, फलटण, कोरेगाव, माण या ८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी विविध वाहनांचा ताफा आरक्षित … Read more

उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर शंभुराज देसाई चांगले भडकले; म्हणाले, “ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय त्यांनी…”

Patan News 8

पाटण प्रतिनिधी । आज पाटण येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे शंभुराज देसाई चांगलेच भडकले. त्यांनीही उद्धव ठाकरे यांना लगेच प्रत्युत्तर दिले. “मी माझी पत्नी प्राप्तिकर भरतो, त्यामुळे कुठल्याही आणि कसल्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे. मी मुख्यमंत्री … Read more

निवडणूक कर्तव्यावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना चक्रीका ॲप बंधनकारक : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे

Karad News 44

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी होत आहे. सदर निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत असून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी नियुक्त सर्व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना चक्रिका ॲप  डाउनलोड करणे बंधनकारक आहे, अशी माहिती कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज सेक्टर ऑफिसर्स यांच्या प्रशिक्षणावेळी … Read more

“जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री”; पाटणमध्ये उद्धव ठाकरेंचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

Patan News 7

पाटण प्रतिनिधी । “शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? असं तुम्हाला वाटतं. म्हणजे शिवसेनेनं मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे. जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री. बस वाजंत्री वाजवत. “पाटणमध्ये एक गद्दार आहे. तो राज्यातील मंत्री लुटमार मंत्री आहे. त्याने मंत्री असताना सरकारी पैशांचा वापर कसा केला हे … Read more

कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण उत्साहात

Karad News 43

कराड प्रतिनिधी । कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे यांत्रिकीकिरण प्रक्रियेतून इतर विधानसभा मतदारसंघातून मतदार संघातील निवडणूक कर्तव्यावर आलेल्या सर्व केंद्राध्यक्ष व सर्व मतदान अधिकाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण शनिवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सैदापूर येथे पार पडले. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात झालेल्या प्रशिक्षणास प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी सकाळ सत्रात प्रत्यक्ष मतदान यंत्रे हाताळणीचे प्रशिक्षण घेतले. सर्व उपस्थित … Read more

कराड विमानतळावर उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांना पाहताच ठाकरे म्हणाले, शाब्बास…

Karad News 42

कराड प्रतिनिधी । पाटण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद उर्फ भानुप्रताप कदम यांच्या प्रचार सभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅगा, साहित्याची रविवारी कराड विमानतळावर तपासणी करण्यात आली. विमानात असलेल्या पिशवी उघडून पाहण्यात आली. दरम्यान, नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहित्याची देखील तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यानंतर … Read more

मतदान केंद्रावर पार्टी कराल, तर तत्काळ होईल निलंबन !; ‘त्या’ कर्मचाऱ्यांचा पाठविला जाईल शिस्तभंगाचा प्रस्ताव

Satara News 60

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघातील निवडणूक विभाग प्रशासन मतदानाच्या प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. दि. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दरम्यान, मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार गहू नये व गहू देऊ नये यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून … Read more

केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या शरद पवारांनी 40-45 वर्षाच्या काळात महाराष्ट्राला काय दिले?; प्रवीण दरेकरांचा सवाल

Karad News 41

कराड प्रतिनिधी । केंद्रात, राज्यात अनेक वर्षे मंत्री राहिलेल्या जेष्ठ नेते शरद पवार यांनी ४०-४५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राला त्यांनी काय दिले? शरद पवार हे जर नोकऱ्या, रोजगार पाहिजे असेल तर मी सांगतोय त्याला निवडुन द्या असे सांगत असतील तर ४० वर्षे तुम्ही काय केले? आमदार बाळासाहेब पाटील हे २५ वर्षे आमदार आहेत. २५ वर्षे झाले … Read more

कराड दक्षिणमधील मलकापूरसह वडगाव हवेलीत ‘पिंक बूथ’ केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ठरतील : निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे

Karad News 40

कराड प्रतिनिधी । यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघात १९३ मलकापूर व ३२१ वडगाव हवेली येथे ‘ पिंक बूथ ’ उभारण्यात येणार असून ही दोन्ही मतदान केंद्रे  सर्व महिला अधिकारी व कर्मचारी चालवतील, त्यांच्या उत्कृष्ट कामकाजाने ही मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्रे ( मॉडेल बूथ सेंटर) ठरतील असा विश्वास २६० कराड दक्षिण चे निवडणूक निर्णय … Read more

माण-खटाव विधानसभा मतदारसंघात यावेळी परिवर्तन निश्चित : शरद पवार

Karad News 20241117 103731 0000

सातारा प्रतिनिधी | दहिवडी (ता. माण) येथे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची शनिवारी सभा पार पडली. यावेळी ‘माण-खटावमधील जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील नेतेमंडळी एकत्रित आले आहेत. दोन्ही तालुक्यांतील प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्यांची जबरदस्त शक्तीच माण-खटाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवेल, … Read more