साताऱ्यात 3 संघटनांचा आक्रमक पावित्रा; जिल्हाधिकाऱ्यांकडून मात्र,आश्वासनांची खैरात

Satara News 56 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वांनी नववर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सातारा शहरात विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाकडे वेगवेगळ्या मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. विविध संघटनांच्या आंदोलनामुळे सातारकरांचा सोनवणे हा आंदोलनवार ठरला. रेशनींगच्या पॉज मशीनसह वेगवेगळ्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्ह्यातील रेशन दुकानदारांनी येथील तहसीलदार कार्यालयावर बेमुदत संप सुरू केला. फलटण येथे नियमबाह्य भूसंपादन झाल्याच्या … Read more

शामगावला टेंभूचे पाणी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू; सचिन नलवडेंचा इशारा

Karad News 17 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव येथील शेतकऱ्यांची पिके पाणी नसल्याने वाळत चालली आहेत. बोम्बाळवाडी तलावामधून शामगाव येथील जवळपास शंभर शेतकऱ्यांच्या पाइपलाइनद्वारे दीडशे ते दोनशे एकर क्षेत्र ओलिताखाली येत असते. परंतु टेम्भू योजनेचे पाणी बोबळवाड़ी तलावात सोडले नसल्याने हा तलाव आटला आहे. या कारणाने आज रयत क्रांती संघट्नेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशा्ध्यक्ष तथा ऊस नियंत्रण मंडळाचे … Read more

जिहे-कठापूरचे काम बंद पडणार; कुणी दिला इशारा?

Satara News 55 jpg

सातारा प्रतिनिधी । गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यांमध्ये कठापूर आणि सातारा तालुक्यातील तासगाव येथील शेत जमिनी बाधित झाल्या आहेत. राज्य सरकारने जमिनींचे मूल्यांकन करताना सातारा तालुक्याला झुकते माप दिले असून कठापूर येथील शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. रेडीरेकनर दरातील तफावत दूर करून सर्व शेतकऱ्यांना एकाच दराने मूल्यांकन करावे, अशी मागणी करत जोपर्यंत सरकार याबाबत … Read more

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्ह्यात आजपासून अनोखं अभियान सुरू

Satara News 20240101 135545 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दि. 1 जानेवारी पासून जनसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात बर्गे यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा … Read more

मुद्रांक शुल्क, दंडातील सवलतीसाठी ‘ही’ योजना आहे खास; सातारा जिल्हयात शासनाने केली लागू

Satara News 20240101 132340 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या दस्तांच्या बाबतीत मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या रक्कमेवर आणि दंडावर सवलत देण्यासाठी राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजीच्या परिपत्रकान्वये अभय योजना लागू केली असून ही योजना पहिल्या टप्प्यात ३१ जानेवारी २०२४ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. मुद्रांक शुल्क अभय योजनेचा कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू असणार आहे. … Read more

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा

Satara News 54 jpg

सातारा प्रतिनिधी | केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भूजल योजना अंतर्गत येणाऱ्या माण तालुक्यातील 35 गावांचे व खटाव तालुक्यातील 31 गावांतील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे सदस्य भूजल मित्र प्रगतशील शेतकरी यांच्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दि. 3 जानेवारी 2024 रोजी दहिवडी कॉलेज येथे ही कार्यशाळा पार पडणार आहे. दि. … Read more

बोरगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई : 25 लाखांचा अंमली पदार्थ,वाहन जप्त

Crime News 23 jpg

सातारा प्रतिनिधी । अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई करत दोघं जणांना अटक केल्याची घटना सातारा कराड मार्गावर घडली. या प्रकरणी बोरगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 1) बाबासो बडा मडके (वय 36, रा. महावीर चौक, रुई जि.कोल्हापुर) 2) दिपक कल्लापा अबदान (वय 42, … Read more

एसटी बस चालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू

Satara News 53 jpg

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे एसटी बस चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची नोंद रहिमतपूर पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कल्याण ते वडूज या बसवर सुरेश यादवराव भोसले (वय 49, रा. कोनगाव, ता. कल्याण) चालक म्हणून काम करीत होते. वाहक रोहित शिवलिंग साखरे यांच्यासोबत … Read more

नरेंद्र मोदी हे देशाला समर्पित आयुष्य देणारे पंतप्रधान : डॉ. भारती पवार

Karad News 16 jpg

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची झपाट्याने प्रगती होत आहे. जगात २२० कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले असून, नरेंद्र मोदींमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रुपाने भारताला समर्पित आयुष्य देणारा पंतप्रधान लाभला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य व … Read more

अभिनेता किरण मानेंनी Facebook Post करत साताऱ्यातील वर्षभराच्या आठवणी केल्या ताज्या

Kiran Mane News jpg

सातारा प्रतिनिधी । बिग बॉस ४ नंतर किरण माने हे नाव सतत चर्चेत आले. बिग बॉसमध्ये त्यांची एक वेगळी बाजूही प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मालिका, सिनेमांतील ऊत्तम अभिनयामुळे किरण माने नाव घराघरात पोहचलं. हे किरण माने मूळचे सातारचे होय. ते नेहमी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. बरेचदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार, आपली मतं लोकांसमोर … Read more

सेवागिरी महारांजाच्या यात्रा कालावधीत ‘अशी’ राहणार वाहतूक सुरु

Satara News 51 jpg

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांची यात्रा दि. 10 जानेवारी रोजी होणार आहे. श्री. सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त सातारा जिल्हा तसेच राज्यातुन मोठया प्रमाणात भाविक येतात. दरम्यान, यात्रेदिवशी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दि. 6 जानेवारी ते 16 जानेवारी 2024 रोजीपर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल करण्यात आलेला आहे. दि. 10 जानेवारी रोजी रथ मिरवणुकीचा कार्यक्रम … Read more

साताऱ्यातील ‘या’ महाविद्यालयात होणार 12 जानेवारीला ‘अनोखा’ परिसंवाद

Satara News 50 jpg

सातारा प्रतिनिधी । भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इतिहास विभागमार्फत परिसंवाद आणि मराठवाडा इतिहास परिषदेचे 43 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजितकरण्यात आले आहे. दि. 12 व 13 जानेवारी 2024 रोजी बॅरिस्टर पी. जी. पाटील सभागृहात होणाऱ्या या अधिवेशनात परिसंवादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनात … Read more