आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी; अतुल म्हेत्रे यांचे तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटलांना निर्देश

Karad News 31

कराड प्रतिनिधी । आचारसंहितेत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वप्रथम सर्वांनी काळजी घ्यावी. दरम्यान मतदान केंद्रावर कोणतीही गैरसोय होणार नाही याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचारी यांची असेल आदी निर्देश कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी आज पोलीस पाटील व ग्रामसेवक, तलाठी यांना दिले. महाराष्ट्र … Read more

चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत नाहीत; फलटणच्या सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

Amol Kolhe News

सातारा प्रतिनिधी | संपूर्ण महाराष्ट्रात शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे व राहूल गांधी यांची लाट नव्हे तर सुनामी आली आहे. भारतीय जनता पक्ष, अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष व शिंदे शिवसेनेला महाराष्ट्राने हद्दपार करण्याचं ठरवलेलं आहे. फलटणमध्ये समोर असलेल्या पक्षाचे चिन्ह हे शरदचंद्रजी पवार साहेबांकडून चोरलेल चिन्ह आहे, आणि चोरलेली गोष्ट कधी अभिमानाने मिरवता येत नाही असा … Read more

कराडचे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबरच्या ‘या’ तारखेला होणार प्रदर्शन

Karad News 30

कराड प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुक सुरु असून या निवडणुकीचा फटका हा दरवर्षी होणाऱ्या कराडच्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनास बसला आहे. निवडणुकीमुळे कराड शेती उत्पन्न बाजार समितीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून १९ वे स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु-पक्षी प्रदर्शन (Yashwantrao Chavan Agriculture Exhibition) , कृषि महोत्सव यावर्षी नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार … Read more

सातारा जिल्ह्यातील 17 साखर कारखान्यांकडून गाळप परवान्यांसाठी अर्ज

Satara News 50

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व १७ साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे देऊन या हंगामातील गाळप परवाने मिळवण्यासाठी साखर आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. बहुतांश साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिली आहे. साखर आयुक्त कार्यालयाने देखील टप्प्याटप्प्याने परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, २० नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. … Read more

वांग-मराठवाडी परिसरातील सौंदर्याची पर्यटकांना भुरळ; नेत्रसुखद अनुभवासाठी पर्यटकांची भेट

Patan News 6

पाटण प्रतिनिधी । पवनचक्कीची गरगर फिरणारी पाती, बाजूने हिरवेगार डोंगर आणि या डोंगराच्या कुशीत असलेले वांग-मराठवाडी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत चालली असून, वांग-मराठवाडी धरण पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरत आहे. धरण परिसरातील व्यवसायांना त्यामुळे तेजी प्राप्त झाली असून पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. एका बाजूला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे घनदाट जंगल … Read more

कोरेगाव, माण मतदारसंघात 903 जादा मतदान यंत्रे; प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी

Satara News 49

सातार प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे. कोरेगाव तसेच माण विधानसभा मतदारसंघात उमेदवार संख्या वाढल्याने ९०३ अतिरिक्त मतदान यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही मतदानयंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्या मतदान यंत्रांची तपासणी आली असून त्या-त्या मतदारसंघात त्या मतदान यंत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. जिल्ह्यातील … Read more

सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

Satara News 48

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या … Read more

जिल्ह्यात 8 हजार 442 भावी शिक्षक उद्या देणार TET चा पेपर; फिंगरप्रिंट, चेहराही स्कॅन होणार

Satara News 47

सातारा प्रतिनिधी । शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा उद्या रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा होईल का नाही, अशी भावी शिक्षकांमध्ये धाकधूक होती. मात्र, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली यासाठी जिल्ह्यात परीक्षा केंद्र निश्चित करून तेथे बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात … Read more

बिबट्याकडून तब्बल 16 कोंबड्यांचा फडशा; चाफळ परिसरात बिबट्याचा वावर

Crime News 4

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील चाफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीतील दीपक उर्फ गोट्या सपकाळ यांच्या घराबाहेर ठेवलेल्या कपाटातील तब्बल १६ कोंबड्यांचा बिबट्याने फडशा पडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपक सपकाळ यांनी कोंबड्या पाळलेल्या होत्या. घराच्या बाहेरील बाजूस कोंबड्या ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुरुवारी रात्री … Read more

कोरेगावात वसना नदीच्या पुलावर अपघात; बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार

Crime News 20241109 095518 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव- सातारा रस्त्यावर येथील रेल्वे स्टेशनजवळून वाहणाऱ्या वसना नदीच्या पुलावर काल रात्री पावणेदहाच्या सुमारास एसटी बसला समोरून धडक दिल्याने बुलेटस्वार जागीच ठार झाला. गजानन हिरामण जाधव (वय ३५, रा. सस्तेवाडी, वीस फाटा, ता. फलटण) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव-सातारा रस्त्याने कोरेगाव आगाराची सोलापूर- सातारा ही … Read more

वेण्णालेकवर पर्यटकांना मारहाण; महाबळेश्वरात सहा जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20241109 082409 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हयातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक परिसरात सद्या मोठ्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, त्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. अशीच मारहाणीची घटना नुकतीच घडली आहे. मुंबईहून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक स्टॉलधारकांमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी सुरू झाली. काही वेळातच दोन्ही बाजूंकडून हाणामारीची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून, याप्रकरणी महाबळेश्वर … Read more

सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

Crime News 20241109 075942 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील … Read more