महाराष्ट्रातील जनता गहारीचा डाग पुसून काढेल, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर हल्लाबोल

Karad News 20241028 222438 0000

कराड प्रतिनिधी | साताऱ्यातील आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, मनोज घोरपडे (महायुती), आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील (महाविकास आघाडी) या दिग्गजांनी तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर यांनी अपक्ष म्हणून विराट शक्तीप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कराड येथे आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. … Read more

भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत; अखेर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढत दिले जीवदान

Bhilar News 20241028 214246 0000

सातारा प्रतिनिधी | भक्षाचा पाठलाग करत असताना सुमारे ३५ फुट खोल विहीरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचारी व प्राणीमित्रांनी‌ सुखरूप बाहेर काढून जीवदान दिल्याची घटना महाबळेश्र्वर तालुक्यातील भिलार येथे आज घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्र्वर तालुक्यातील भिलार येथे शिवारात आज एका विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वनविभाग अधिकारी व कर्मचारी यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्यासह … Read more

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून सचिन पाटलांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

Phalatan News 20241028 201634 0000

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघांमधून सचिन सुधाकर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. फलटण येथे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण आणि सचिन पाटील कांबळे यांच्यात लढत होणार आहे. फलटण विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ही उद्या मंगळवार पर्यंत आहे. दरम्यान मुदत संपण्याच्या … Read more

पाटणमध्ये यंदा 1983 सारखी होणार पुनरावृत्ती; विराट शक्तीप्रदर्शनाने सत्यजित पाटणकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

Patan News 20241028 191855 0000

पाटण प्रतिनिधी | सर्वसामान्य जनता ज्यावेळी निवडणूक आपल्या हातात घेते, संघर्ष करते आणि सत्ताधाऱ्यांचे गद्दारी, मलिदा, टक्केवारी, कमिशन हुकूमशाहीचे राजकारण उध्वस्त करण्यासाठी समोर येते, त्यावेळी विजय हा नैतिकतेचा आणि चांगल्या उमेदवाराचाच होतो. १९८३ साली माझ्या बाबतीत जे घडलं तेच आता सत्यजितसिंह पाटणकर यांच्या बाबतही घडणार असून २३ नोव्हेंबरला सत्यजितसिंह पाटणकर हेच पाटण विधानसभेचे आमदार होतील … Read more

कराडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवल्यानंतर तणाव निवळला

Karad News 13

कराड प्रतिनिधी | कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी आज शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा भाजपचे … Read more

कराड दक्षिण विधानसभेसाठी आज पृथ्वीराज चव्हाणांसह चौघांनी भरले अर्ज; 8 उमेदवारी अर्जांची विक्री

Karad News 12

कराड प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. २२ ऑक्टोबर रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते तथा महा विकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह चार उमेदवारांनी ६ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. आज अखेर १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली असल्याची … Read more

साताऱ्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती; 8 मतदारसंघात आता ‘काटे की टक्कर’

Satara News 1 3

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर झालेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या अंतिम तारीख आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, वाई, पाटण, कोरेगाव, फलटण, माण या आठ मतदारसंघात लढती निश्चित झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी उमेदवारांमध्ये काटे कि टक्कर पहायला मिळणार आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या आठही विधानसभा मतदार संघातून … Read more

सातारा जिल्ह्यातील 594 प्राथमिक शाळांमध्ये आता सीसीटीव्हीची नजर

Satara CCTV News

सातारा प्रतिनिधी | विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 622 पैकी 594 माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. उर्वरित शाळांमध्येही कॅमेरे बसवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांशी पत्रव्यवहार करून आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या … Read more

कराड दक्षिणेतून पृथ्वीराज बाबांनी साधेपणाने तर उत्तरेतून मनोज घोरपडेंनी वाजत गाजत भरला अर्ज

Karad News 20241028 131744 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी महायुतीचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मनोज घोरपडे यांनी तर महाविकास आघाडीतून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी … Read more

जिल्ह्यातून दिवाळीत लालपरी धावणार सुसाट; विविध भागांत वाढविल्या 31 जादा फेऱ्या

ST Bus News

सातारा प्रतिनिधी | दिवाळीच्या सुट्या सुरू असलेल्या प्रत्येकाला या सणानिमित्ताने आपल्या माणसांना भेटण्याची ओढ लागली आहे. हीच मनोकामना लालपरी पूर्ण करणार आहे. या काळात प्रत्येकाचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. सातारा जिल्ह्यातून विविध भागात जादा फेऱ्या वाढविल्या आहेत. विविध भागात सरासरी ३१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. सातारकरांचे … Read more

बिबट्याकडून दुचाकीस्वारांचा पाठलाग; उंडाळे परिसरामध्ये बिबट्यासह २ बछड्यांचा धुमाकूळ

Karad News 11

कराड प्रतिनिधी | उंडाळेसह परिसरात मादी बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी – धुमाकूळ घातला आहे. उंडाळे तुळसण रस्त्यावर शनिवारी दिवसभरात दहा ते पंधरा दुचाकीस्वारांचा बिबट्याने पाठलाग केला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उंडाळे व तूळसण फाटा दरम्यान निगडीचा ओढा म्हणून प्रसिद्ध असलेल्या परिसरात शनिवारी दिवसभरात बिबट्या व तिच्या दोन पिल्लांनी शनिवारी दिवसभरात अनेकदा … Read more

कोरेगावात 1,738 अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदान प्रशिक्षण

Koregaon ews

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव मतदारसंघ निवडणुकीसाठी दोन दिवसांत १ हजार ७३८ अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. केंद्राध्यक्ष तसेच विविध मतदान अधिकारी तसेच सर्वच कर्मचारी यांनी मतदानविषयक आपले कर्तव्य अचूक बजावावे. समन्वयाने काम करावे. एकमेकांमध्ये सामंजस्य ठेवावे आणि मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यास योगदान द्यावे असे आवाहन प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांनी केले. कोरेगाव मतदारसंघाच्या ३५४ मतदान … Read more