विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार द्यावी – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

Satara Farmar News 1

सातारा प्रतिनिधी । कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपीकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजार मुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र, फळपीकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळपीकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे अर्थिक स्थैर्य अबाधित राखणेसाठी पुर्नरचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. … Read more

रहिमतपुरात शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून रॅलीसह मानवी साखळीद्वारे मतदान जागृती

Rahimatpur News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदान जनजागृती अभियानातंर्गत रहिमतपूर नगरपरिषदेमार्फत वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज ,आदर्श प्राथमिक व माध्यमिक विद्यालय ,आणि कन्या प्रशाला रहिमतपूर यांच्या सहयोगाने मतदान जनजागृतीपर विद्यार्थ्यांच्या रॅलीचे रहिमतपूर शहरात आयोजन करण्यात आले. ‘आपल्या मतामुळे होणार आहे लोकशाहीचा सन्मान, अवश्य करा मतदान’ असे संदेश फलक घेऊन रॅली काढण्यात … Read more

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार

Satara News 30

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोघांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते (वय 35 वर्षे रा. नागठाणे ता.जि. सातारा) व विक्रम अधिक यादव (वय 31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा) … Read more

विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’; नेत्यांवर मनधरणीची वेळ

Satara News 29

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारसभा, रॅली, पदयात्रा, बैठकांचा धडाका सुरू आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस उरले असून राजकीय पक्षांना प्रचारासाठी कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ आली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांना कार्यकर्त्यांसाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व व्यवस्था करून मेजवानी द्यावी लागत आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत प्रचंड चुरशीने प्रचार यंत्रणा राबवली जाऊ लागली … Read more

सातारा जिल्ह्यात 23 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्याधिकाऱ्यांकडून शस्त्र व जमाव बंदी आदेश

Satara News 28

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र … Read more

मतदार जनजागृतीसाठी फलटणमध्ये मानवी साखळीमधून साकारला महाराष्ट्राचा नकाशा

Phaltan News 1

सातारा प्रतिनिधी । विधानसभा सार्वजनिक निवडणूक 2024 अनुषंगाने 255 फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघांमध्ये स्वीप अंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती होण्यासाठी तसेच मतदानाचा टक्का वाढावा यासाठी 1 हजार विध्यार्थी, युवक व मतदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या नकाशामध्ये फलटण 100 टक्के मतदान रांगोळीच्या व मानवी साखळी द्वारे करण्यात आले तसेच मानवी साखळी द्वारे जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. फलटण येथील … Read more

मतदार यादीत Deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही – निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । मतदारयादीत deleted शिक्का असल्यास त्यांना मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही. अशी कोणतीही procedure मतदान केंद्रावर होत नसल्याची महत्वाची माहिती सातारा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले यांनी दिली आहे. याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले म्हणाले की, ज्यांची नावे यादीतून delete झाली आहेत, म्हणजे यादीत नावावर deleted असा शिक्का लागला … Read more

पंतप्रधान कितीही म्हणत असले तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही : खा. अमोल कोल्हे

Karad News 1

कराड प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचा हरियाणा करू अशी भाषा करत आहेत. परंतु त्यांच्या हेही लक्षात आहे की हे करत असताना महाराष्ट्रात शरद पवार यांच्यासारखी व्यक्ती पहाडासारखी उभी आहे. ते महाराष्ट्रातील जनतेचे सह्याद्री आहेत. त्यामुळे पंतप्रधान कितीही म्हणत असले तरी महाराष्ट्राचा हरियाणा होणार नाही, हे त्यांनाही माहित आहे. बटेंगे तो कटेंगे सारख्या नरेटिव्हला महाराष्ट्र … Read more

कोरेगाव हद्दीत एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा

Crime News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्‌गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० … Read more

अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा; पुसेसावळीतील सभेत डॉ. कोल्हे यांचा महायुतीवर निशाणा

Amoll Kolhe News 20241113 101119 0000

सातारा प्रतिनिधी | गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाची थट्टा करण्यात आली. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला असणाऱ्या उज्ज्वल परंपरेला काळिमा फासला. त्यामुळे प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाच्या मनात राग आहे. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे, असा विश्वास खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या वतीने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात आयोजित सभेत ते बोलत … Read more

जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले

Jaykumar Gore News 20241113 083126 0000

सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले … Read more

साताऱ्यात नऊ आमदारांची प्रतिष्ठा पणाला; कुणाचा होणार करेक्ट कार्यक्रम!

Satara News 25

सातारा प्रतिनिधी । राज्याच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जिल्ह्यातील चार नेते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. यशवंतराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा जिल्ह्यातील मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत असताना राज्याच्या प्रमुखपदाची भूमिका बजावली. तर, बाबासाहेब भोसले आणि एकनाथ शिंदे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील मात्र, त्यांना देखील राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली … Read more