फलटणमध्ये भरवस्तीत घरफोडी; 20 तोळ्याच्या दागिन्यांसह 25 हजाराची रोकड लंपास

satara crime

सातारा प्रतिनिधी । फलटण शहरातील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घर फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी 17 ते 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे 25 हजाराची रोकड लुटली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून भरवस्तीत असे साहस करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेपुढे आव्हान उभे केले आहे. फलटण शहरातील कॉलेज रोड अर्थात शुक्रवार पेठेतील अनघा … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अधिकृत फेसबुक पेज हॅक

shivendra raje bhosale

सातारा प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचे सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक वरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जनसंपर्क कर्यालयाकडून रीतसर तक्रार करण्यात आली असून संबंधित हॅकरवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. असंख्य फॅन फॉलोईंग … Read more

कृष्णाकाठी पाण्याची परिस्थिती बिकट, कोयना धरणातून सोडले पाणी

koyna dam water

सातारा प्रतिनिधी । पावसाने ओढ दिल्याने पुर्वेकडील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट बनली आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्याची विनंती सांगली महापालिकेकडून पाटबंधारे विभागाला करण्यात आल्यानंतर शनिवारी कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील एक युनिट कार्यान्वित करून १०५० क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. कृष्णा नदीचे पात्र पडले कोरडे कृष्णा नदीच्या पात्रातील पाण्याने अनेक ठिकाणी तळ गाठला … Read more

तवेरा गाडीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक; भीषण अपघातात 3 ठार, 4 जखमी

satara accident

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर सातार्‍यातील बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाणपुलानजीकच्या हुंडाई शोरूमसमोर तवेरा गाडीने बोलेरो पिकअपला पाठीमागून धडक दिली आहे. या भीषण अपघातात तवेरा गाडीतील तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. निखिल शशिकांत चौखंडे, प्रियांका निखिल चौखंडे, शशिकांत यदुनाथ चौखंडे, अशी मृतांची नावे आहेत. जखमींची नावे समजू शकलेली नाहीत. गाडीचा टायर … Read more

कोयनानगरमध्ये टेम्पो- दुचाकीची समोरासमोर धडक; 2 तरूण जागीच ठार तर 1 जखमी

SATARA ACCIDENT

सातारा प्रतिनिधी । सातार्‍यातील पर्यटनस्थळ असलेल्या कोयनानगरजवळ शुक्रवारी रात्री आयशर- दुचाकीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले असून एक तरूण गंभीररित्या जखमी झाला आहे. धीरज बनसोडे, प्रणय कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. दुचाकी चालक प्रसाद कदम हा तरूण गंभीर जखमी असून त्याच्यावर पाटण ग्रामीण रूग्णालयात उपचार … Read more

कराड – पाटण मार्गावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘रास्तारोको’; ST Bus अडवत केले ठिय्या आंदोलन

karad patan raod students

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण मार्गावर सकाळी 6:30 वाजल्यापासून ते 7:30 या वेळेत एसटी बसेस थांबत नसल्याने आक्रमक झालेल्या महाविद्यालय मधील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आज सकाळी सुपने येथे एसटी बस रोखून धरत ठिय्या आंदोलन केले. यावेळी सुपने ग्रामपंचायत व विद्यार्थी यांच्याशी दुपारी एसटी अधिकारी यांची बैठक लावण्याचा निर्णय झाल्याने विद्यार्थ्यांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले. कराड … Read more

महागाई, शेतकरी धोरणांविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; कराडमध्ये आज युवा आक्रोश मशाल मोर्चा

congress protest karad

कराड प्रतिनिधी । बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, स्पर्धा परीक्षा घोटाळा, शेतकरी विरोधी धोरणांविरोधात शुक्रवारी महाराष्ट्र युवक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत आणि उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या उपस्थितीत कराड शहरात युवा आक्रोश मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत हे कराडमध्ये दाखल झाले आहेत. युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सोबत ते … Read more

‘या’ कारणावरून मोरगिरी बाजारपेठेत तणाव; पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात

Morgiri 20230824 224722 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील मोरणा भागातील मोरगिरी बाजारपेठेत आठवडी बाजार कोठे भरवायचा या कारणावरून दोन गावांतील ग्रामस्थांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलीस आणि महसूल विभागाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली. सन १९६६ पासून मोरणा विभागातील पेठशिवापूर ग्रामपंचायत हद्दीत आठवडी बाजार भरला जातो. गेल्या पस्तीस ते चाळीस गावांचा समावेश असणारा हा मोरणा विभाग असून या भागात … Read more

Satara News : पवारांच्या आधीच भाजपकडून तृतीयपंताच्या हस्ते नगरपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

Sharad pawar satara 20230824 202616 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी होणाऱ्या दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन भाजपने गुरूवारीच तृतीयपंथीयाच्या हस्ते केले. माण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद उफाळून आला आहे. शरद पवारांच्या दौऱ्याआधीच उद्घाटन खासदार शरद पवार शुक्रवारी (दि. २५) सातारा दौऱ्यावर आहेत. सायंकाळी दहिवडीत त्यांची जाहीर सभा तसेच दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन … Read more

कापील गावच्या लोकनियुक्त सरपंच अपात्र; पदाचा गैरवापर केल्याचा आरोप

Kapil village 20230824 193002 0000 2 jpg

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कापील गावच्या  लोकनियुक्त सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना अपात्र करण्यात आले आहे. सरपंचांनी पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायतीची 24 बाय 7 पाणीपुरवठा योजनेतील मीटर सर्वांना एकाच दराने वाटप केली नसल्याची तक्रार तक्रारदार गणेश पवार यांनी केली होती. त्यानंतर सरपंच कल्पना तानाजी गायकवाड यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती  विभागीय आयुक्त सौरभ … Read more

इनरव्हील क्लबतर्फे उद्या अंगणवाडी सेविकांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबीर

Innerwheel Club

कराड प्रतिनिधी । इनरव्हील क्लबच्या वतीने आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सहकार्याने शुक्रवार, दि. 25 ऑगस्ट रोजी अंगणवाडी सेविकांसाठी ब्रेस्ट कॅन्सर तसेच ईसीजी तपासणी आयोजित करण्यात आली आहे. सदर तपासणी कार्वे-गोळेश्वर रोडवरील सिद्धार्थ मंगल कार्यालयात करण्यात येणार असून आशा सेविकांनी तपासणी करून घ्यावी. या शिबिरात सुमारे 700 अंगणवाडी सेविका तपासणीसाठी येणार आहेत. स्वतः डॉ. सुरेश भोसले, नर्सिग … Read more

चांद्रयानाच्या यशात राजधानीचाही हातभार; साताऱ्याचे अजिंक्य वाघ ISRO मध्ये कार्यरत

ajinkya wagh satara 1 jpg

सातारा प्रतिनिधी । संपूर्ण जगाचे लक्ष्य लागून असलेले भारताचे चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्रावर पोचले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला असून जागतिक पाळतीवर देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. चांद्रयान-3 च्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद साजरा करण्यात येत आहे. फटाके फोडून, शुभेच्छा देऊन, ट्विट करून लोक इस्त्रोवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. ISRO चे … Read more