मधुमित्र ऍडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराडमध्ये TYPE 1 मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न

Madhumitra karad

कराड । मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिक फॉर डायबेटीस & ओबिसिटी कराड या ठिकाणी 25 ऑगस्ट रोजी टाईप 1 मधुमेह असणाऱ्या मुलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर संपन्न झाले. मधुमित्र ॲडव्हान्स क्लिनिकच्या मधुमेह तज्ञ डॉ. गौरी ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 40 टाईप 1 डायबेटिस असणाऱ्या लहान मुलांची रक्ततपासणी यावेळी करण्यात आली. पुण्याचे केइएम हॉस्पिटल आणि मुकुल माधव फाऊंडेशन यांच्या सहकार्याने … Read more

कराडात पार पडला अनोखा शिवविवाह!! ना विधी, ना भटजी, ना अक्षता..

Shiv Vivah In Karad

लग्न म्हंटल कि, सनई चौघडे आले, ब्राह्मण आले, विधी, शुभमुहूर्त आला आणि धुमधडाका आला.. आपल्या हिंदू धर्मात अशाच पद्धतीने लग्न केलं जाते आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचं वचन दिल जाते. मात्र सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात एक आगळावेगळा शिव विवाहसोहळा (Shiv Vivah In Karad) पार पडला आहे. किरण आणि शिवानी असं सदर वर- वधूचे नाव असून … Read more

शशिकांत शिंदे यांचे साताऱ्यात जंगी स्वागत; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह

shashikant shinde satara

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) याना उमेदवारि देण्यात आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे प्रथमच जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी हार घालून शशिकांत शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या भव्य दिव्य शक्तीप्रदर्शनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण … Read more

कराडमध्ये भर वस्तीतील बंगल्यात धाडसी चोरी, खिडकीचे गज कापून 38 लाखांचे दागिने लंपास

Gold Robbery In Karad

कराड– शहरातील भर वस्तीत धाडसी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. शिवाजी स्टेडियम नजीकच्या हौसिंग सोसायटीतील बंगल्यातून चोरट्यांनी 38 लाखांचे दागिने लंपास (Gold Robbery In Karad) केले आहेत. त्यात हिऱ्यांच्या दागिन्यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे कराड शहरात (Karad City) एकच खळबळ उडाली आहे. बंगल्याच्या खिडकीचे गज कापूस चोरटे बंगल्यात घुसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी … Read more

महात्मा गांधी विद्यालय कालेचे शिक्षक किरण कुंभार सर रेखाटणार अयोध्येतील राम मंदिर परिसरात चित्रे

Kiran Kumbhar Ram Temple Ayodhya

सातारा । सध्या संपूर्ण देशात राम मंदिर उदघाटन सोहळ्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. येत्या २२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिर परिसरात काही चित्रे लावण्यात येणार आहे. ही सर्व चित्रे देशातील २० चित्रकारांकडून रेखाटली जाणार आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील … Read more

कराड येथील डुबल घराण्यात बसतो फक्त दीड दिवसाचा गणपती; थेट युद्धाशी आहे कनेक्शन

karad dubal family ganpati

गणेशोत्सव विशेष । मित्रानो, सध्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असून जनतेमध्ये अत्यंत उत्साहाने आणि आनंदाचे वातावरण आहे. प्रामुख्याने १० दिवस गणपतीची स्थापना करून ११ व्या दिवशी आपण गणेश विसर्ज करतो. काही ठिकाणी ५ तर काही ठिकाणी दीड दिवसाचा गणपती बसवला जातो. कराड येथील डुबल घराण्यात सुद्धा वर्षानुवर्षे दीड दिवसाचा गणपती बसवला जातो आणि वाजतगाजत गणेशाचे विसर्जनही … Read more

पृथ्वीराजबाबांच्या पाठपुराव्याला मोठं यश; नितीन गडकरींनी उंब्रजच्या पुलाची व्यावहारिकता तपासण्याचे दिले आदेश

UMBRAJ BRIDGE PRITHVIRAJ CHAVAN (1)

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील उंब्रज या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सध्या भराव पूल असून त्याठिकाणी सेगमेंटल (पारदर्शक) उड्डाण पूल होणे अत्यावश्यक असल्याची मागणी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या भागातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्र ई मेल केले तसेच फोनवरून … Read more

रक्षाबंधन करून परतताना दुचाकी अपघातात चिमुकलीसह तिघे जखमी; NDRF चे जवान ठरले देवदूत

karad accident

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगलोर महामार्गावर कराडपासून काही अंतरावर असलेल्या वहागाव गावच्या हद्दीत रक्षाबंधन करून परतत असणाऱ्या दुचाकीचा रस्त्यावरील डिव्हाईडरला धडकल्याने अपघात झाला आहे. महामार्गावर ठेकेदाराने चुकीच्या पद्धतीने सिमेंटचे डिव्हाईडर ठेवल्याने दुचाकी धडकली. यामध्ये एक ५ वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली असून एक स्त्री व एक पुरुष हे किरकोळ जखमी झाले आहेत. ते तालुक्यातील देवकरवाडी येथील … Read more

चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात बेदम मारहाण

satara women beating (1)

सातारा प्रतिनिधी । गुरांना चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना माण तालुक्यात घडली आली आहे. माण तालुक्यातील पानवण या गावात चौघांनी महिलेला उसाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत तिचा विनयभंग केला आहे. जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी … Read more

चांद्रयान 3 च्या यशात काले गावातील प्रवीणचाही हातभार; बजावली ‘ही’ मोठी भूमिका

pravin kumbhar ISRO

कराड प्रतिनिधी । २३ ऑगस्टला भारताने चांद्रयान 3 मोहीम फत्ते करून नवा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारा भारत हा जगातील पहिला आणि एकमेव देश ठरला आहे. भारताच्या या यशानंतर संपूर्ण देशात उत्साह साजरा केला जात असून भारतीय अंतराळ संशोधन केंद्र असलेल्या ISRO च्या शास्त्रज्ञांचा गौरव केला जातोय. चांद्रयान ३ च्या या देदीप्यपणा यशात कराड … Read more

सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय कराडच्या वतीने इस्रोतील वैज्ञानिकांना अनोखे अभिवादन

sarswati vidyalaya karad

कराड प्रतिनिधी । जनकल्याण प्रतिष्ठान संचालित सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय,कराडच्या वतीने चांद्रयान-3 मोहिमेस मिळालेल्या सफलतेचे स्वागत करुन विद्यार्थ्यांनी इस्रोतील वैज्ञानिकांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले. विद्यार्थांनी चंद्र, चांद्रयान-3 व इस्रो या अवकाश प्रक्षेपण केंद्राची प्रतिकृती व राष्ट्रध्वज साकारून ‘NOW INDIA ON MOON’ असे दर्शविले. याप्रसंगी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेच्या संपूर्ण माहितीसह विद्यार्थांनी केलेल्या रचनेची माहिती समन्वयक … Read more

लोकसभा उमेदवारीबाबत उदयनराजे साशंक; म्हणाले, लोकांचा आग्रह पण…

Udayanraje Bhosale

सातारा -सातार्‍यातून लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत खुद्द खासदार उदयनराजे भोसले यांनाच साशंकता आहे. उमेदवारीच्या संदर्भाने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. आताच सगळं उघड केलं तर कसं होणार? लोकांचा आग्रह पण लक्षात घेतला पाहिजे, असे उदयनराजेंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदार संघात भाजपचा उमेदवार कोण असणार, याचा सस्पेन्स वाढला आहे. सातार्‍यातील उमेदवारीचा … Read more