औंध पोलिसांची वाळू वाहतुकीवर धडक कारवाई : 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | खटाव तालुक्यात सद्या बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक होत असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने पुसेसावळी येथे अवैध चोरटी वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर औंध पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत डंपर व 4 ब्रास वाळू असा एकूण 10 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी रमेश नारायण जाधव (वय 23, रा. गुरसाळे) या संशयितास अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील दत्त चौकातून रमेश जाधव हा पिवळा रंगाचा डंपर मधून बेकायदा बिगरपरवाना अवैधरित्या डंपरमधुन घेवून जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता सुमारे 60 हजार रुपयांची सुमारे 4 ब्रास वाळुची चोरटी वाहतुक करीत असताना मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी रमेश जाधव यास अटक केली. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल किरण नामदेव हिरवे यांनी औंध पोलीस ठाण्यात दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांच्या मार्गदर्शनाखाली अश्वीनी शेंडगे, औंध पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे, पोलिस हवालदार आर. पी. कांबळे, पो.ना. आर एस बनसोडे, पो कॉ. के एन हिरवे, पो.कॉ. एम आर जाधव यांनी करीत उघडकीस आणला.