कराडात शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून अतुल मुळीक यांच्याकडून इतिहासाला उजाळा; इतिहास प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
460
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड शहर तसेच तालुक्यातील इतिहास प्रेमींनी मंगळवारी शिवकालीन शस्त्र प्रदर्शनातून शस्त्रांची माहिती घेतली. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन पार पडले. या शस्त्र प्रशासनास नागरिकांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कराड व परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने या शस्त्र प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी प्रदर्शनात शिवकालीन धोप तलवारी, पट्टा, खांडा, जबरदंड, शिरस्त्राण, इटा, बरछा, विजयनगर कट्यार, मराठा, मुघल, राजस्थानी कट्यारी, जंबिया, बिचवे, खंज्राली, तोफांचे गोळे, विविध प्रकारच्या कुऱ्हाडी, धनुष्यबाण, माडू, नायर तलवार, ढाली, कर्द, पेशकब्ज, ठासणीच्या बंदुका, त्याचबरोबर अनेक लहान- मोठी अशी १०० हून अधिक शस्त्रे नागरिकांना पाहायला मिळाली.

या प्रदर्शनात प्रत्येक शस्त्राची माहिती सविस्तरपणे देण्यात आली. शस्त्रांसोबतच शिवराज्याभिषेकावेळी रायगड टांकसाळीत तयार झालेली शिवराई लोकांना प्रदर्शनात पाहायला मिळाली.

उंटावरील झांम्बुराक तोफेचे आकर्षक : अतुल मुळीक

इतिहासाबद्दल असलेल्या आवडीतून मी अनेक शिवकालीन शस्त्र संग्रहित ठेवलेली आहे. प्रदर्शनात सर्वांत आकर्षण ठरले ते उंटावरील झांम्बुराक तोफेचे. मध्य युगात वापरल्या जाणाऱ्या मोठ्या तोफा नागरिकांनी गड-किल्ल्यावर पाहिल्या आहेत. परंतु, संग्रहात असणारी दुर्मीळ ही तोफ या प्रदर्शनाचे आकर्षण ठरली असल्याची प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक अतुल मुळीक यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.