अतुलबाबांनी पूर्ण केलं अनोखं चॅलेंज; झणझणीत चटणीपासून बनलेल्या डिशवर मारला ताव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | भाजप नेते आणि सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी एक अनोखं चॅलेंज पूर्ण केलं आहे. दुबई येथील एका हॉटेल मध्ये तिखट मिरची आणि झणझणीत चटणीपासून बनलेला एक पदार्थ खात अतुलबाबांनी मराठी बाणा दाखवून दिला आहे. याबद्दल अतुल भोसलेंना विजेतेपदाचे सर्टिफिकेट सुद्धा मिळालं असून याबाबतचा त्यांचा फोटो सुद्धा सर्वत्र व्हायरल होत आहे. हे अनोखं चॅलेंज जिंकल्याने अतुलबाबा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

दुबई पेस्टीव्हल सिटी मॉल या ठिकाणी असलेल्या KashKan रेस्टोरंटचे आंतरराष्ट्रीय शेफ रनवीर ब्रार यांनी अनोखं चॅलेंज ठेवलं आहे. पाण्याचा एक घोटही न पिता त्यांनी बनवलेल्या तिखट मिरचीपासूनची एक डिश खायची असं त्यांचं चॅलेंज आहे. दुबईला गेलेल्या अतुल भोसलेंनी हे चॅलेंज स्वीकारलं, आणि फक्त स्वीकारलंच नाही तर जिंकलं सुद्धा.. होय, अतिशय झणझणीत असलेली ही तिखट डिश अतुल बाबांनी घपाघप संपवली आणि विजेतेपदाचा बहुमान पटकावला. अतुल भोसले यांचा विजेतेपदाचे प्रमाणपत्र मिळाल्याचा फोटो सुद्धा व्हायरल झाला आहे.

d286eb69 aaab 4910 ab32 6646c5a65913

KashKan का लाँच केलं?

दुबईमधील लोकांना भारतीय चव मिळावी यासाठी शेफ रनवीर ब्रार यांनी दुबईमध्ये KashKan रेस्टोरंट सुरु केलं आहे. काश्मीर (भारताचा सर्वात उत्तरेकडील भाग ) आणि कन्याकुमारी (देशाच्या दक्षिणेतील एक शहर) या दोन्ही शब्दांचे मिश्रण करून त्यांनी हॉटेलच नाव KashKan असं ठेवलं आहे. याठिकाणी तुम्ही 24k सोन्याने भरलेल्या सिग्नेचर डाळ डिशसह अनेक झणझणीत पदार्थांवर ताव मारू शकता. भारतीय खाद्यपदार्थांची समृद्धता दुबईच्या चैतन्याशी जोडावी अशी इच्छा रनवीर ब्रार यांनी व्यक्त केली.

अतुल भोसले यांच्यावर सातारा लोकसभेची जबाबदारी

दरम्यान, अतुल भोसले हे भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१४ आणि २०१९ विधानसभा निवडणूक अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात लढवली होती. मात्र, दोन्ही वेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता पुन्हा एकदा २०२४ विधानसभा ते भाजपकडून लढण्याची शक्यता आहे.