कराड दक्षिणेत ‘पृथ्वीराज’ अन् ‘अतुल’बाबांमध्ये होणार तगडी फाईट; डॉ. अतुल भोसलेंनी भरला उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, तो ढासळण्यासाठी महायुतीचे कराड दक्षिणचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी चांगलीच तयारी केली आहे. यावेळेस देखील विधानसभा निवडणुकीसाठी डॉ. अतुल भोसले यांनी आज सकाळी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी डॉ. सुरेश भोसले, भाजप खासदार उदयनराजे भोसले, विक्रम पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात म्हाविजास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध महायुती भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्यात यंदा काटे की टक्कर होणार आहे. या विधानसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जरी लढत होणार असली तरी अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीतून कराड दक्षिणमधून संजय गाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, आज दुपारी डॉ. अतुल भोसले यांच्या वतीने वारकरी व माजी सैनिकांसमवेत साधेपणाने आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.