सातारा प्रतिनिधी । रक्षाबंधनाचा सण जवळ आला असल्याने बाजारात आकर्षक राख्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत. मात्र, रक्षाबंधन सणानिमित्त सातारा कारागृहातील महिला बंद्यांच्या वतीने आकर्षक आणि रंगबिरंगी अशा राख्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
सातारा कारागृहातील महिला बंद्यांच्या हाताला काम मिळावे या उदात्त हेतूने आणि विचारणे पुणे विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक, स्वाती साठे यांनी संकल्पनेतून आणि माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा यांच्या सहकार्याने सातारा कारागृहातील महिला बंद्यांना सुबक व आकर्षक राखी तयार केल्या आहेत. या आकर्षक राख्या महिलांनी खरेदी करावे, असे आवाहन कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी केले.
यामध्ये माणदेशी फाउंडेशन, शाखा सातारा येथील प्रोग्रॅम डायरेक्टर अपर्णा सावंत यांच्या योजने अंतर्गत महिला बंद्यांना रक्षाबंधनचे औचित्य साधून राखी प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण ट्रेनर जया काळे, धनश्री पवार यांनी दिले असून या प्रशिक्षणामध्ये कारागृहातील सर्व महिला बंद्यांनी 200 हून अधिक आकर्षक व सुबक राख्या तयार केल्या आहेत.
सदर राखी तयार करण्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमा वेळेस अपर्णा सावंत, ट्रेनर जया काळे, धनश्री पवार, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, महिला शिपाई गीता दाभाडे, जयश्री पवार, मीनाक्षी जाधव, माधुरी वायकर, ज्योती शिंगरे, रूपाली नलावडे, अंकिता करपे, प्रतीक्षा मोरे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी यांनी केले होते.