सातारा प्रतिनिधी । नुकत्याच बालेवाडी पुणे येथे झालेल्या 38 व्या ज्युनियर राज्य मैदानी स्पर्धेत सातारा जिल्हा संघाने उज्वल यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्हा संघाने 6 सुवर्ण, 8 रौप्य व 9 कांस्यपदकासह 23 पदकांची कमाई केली. या स्पर्धेत प्राची देवकर, अनुष्का कुंभार, योगिनी कोकरे, दुर्वा शेवाळे, हर्षवर्धन पवार आणि जान्हवी निकम यांनी सुवर्णपदक पटकवले. या स्पर्धेत राज्यातील 2200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
20 वर्षाखालील गटात अनुष्का कुंभार 400 मी. अडथळा सुवर्ण, 400 मीटर रौप्य,प्राची देवकर 3000 मी. स्टेपलचेस सुवर्ण, 5000 मीटर रौप्य, शुभम इथापे 400 मीटर कांस्य, श्रुती पाटील 400 मीटर अडथळा कांस्य, निकिता पवार 800 मीटर कांस्य,सानिका नलवडे 3000 मीटर स्टेपलचेस, निकिता शेवाळे थाळीफेक रौप्य, दीक्षा थोरवडे हातोडा फेक रौप्य, अपूर्वा बोटे तिहेरी कांस्य.
18 वर्षाखालील गटात योगिनी कोकरे थाळीफेक सुवर्ण,दुर्वा शेवाळे भालाफेक सुवर्ण, वेदांत मोरे लांब उडी रौप्य, वेदांत जिरंगे थाळीफेक कांस्य, सानिका कदम 200 मीटर कांस्य, अभिलाषा वाघमारे 100 मीटर अडथळा रौप्य, श्वेता बनकर उंच उडी कांस्य, प्रांजली साळुंखे थाळीफेक, 16 वर्षाखालील गटात ध्रुव लावंड 80 मीटर अडथळा कांस्य तर 14 वर्षाखालील गटात हर्षवर्धन पवार सुवर्ण, जान्हवी निकम सुवर्ण, अवधूत वाघमळे रौप्य पटकवले. जिल्हा स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.