कराडच्या प्रिशाने आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये पटकावला कांस्यपदकाचा बहुमान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराडच्या आगाशीवनगर येथील युवा खेळाडू प्रिशा शेट्टीने शुुक्रवारी आशियाई कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाचा बहुमान पटकावला आहे. तिने पदार्पणात पदक विजेती हाेण्याचा पराक्रम गाजवला आहे.
तिची लेबनाॅन येथील या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी लक्षवेधी ठरली. कॅडेट गटामध्ये पदकाची मानकरी ठरलेली प्रिशा ही महाराष्ट्राची पहिली महिला खेळाडू ठरली आहे.

सातारा जिल्ह्याची खेळाडू कुमारी प्रिषा शेट्टी हिला कॅडेट गट भारताचे प्रतिनिधित्व करताना कांस्यपदक मिळवले. वास्तविक पाहता ती मागील 8 वर्षापासून एपी स्पोर्ट्स आगाशीवनगर, कराडमध्ये तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेत आहे. यादरम्यान तिला प्रशिक्षक अमोल पालेकर व प्रशिक्षक अक्षय खेतमर यांचे माेलाचे मार्गदर्शन लाभले.यामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदकाचा बहुमान मिळवता आला. तिची नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कामगिरीही काैतुकास्पद ठरलेली आहे.

सातारा जिल्हा आमच्युअर तायक्वांदो असोसिएशन माध्यमातून ती लहान पणा पासून सतत खेळत आहे. तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे व सचिव संदीप ओंबासे सीईओ गफार पठाण, खजिनदार प्रसाद कुलकुर्णी यांचे पाठबळ लाभले. तसेच इंडिया तायक्वांदो चे अध्यक्ष माननीय नामदेव शिरगावकर यांचे पाठबळ व सहकार्य मुळेच आज या ग्रामीण भागातील मुलीने एवढे मोठे यश मिळवले आहे.