सातारा प्रतिनिधी । अमृत महाआवास अभियान ग्रामीणमध्ये विभागस्तरावर केंद्राच्या प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत सातारा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने २८ पैकी तब्बल १६ पुरस्कार मिळवले असून याबद्दल पुण्यात विभागीय आयुक्तांच्या हस्ते आज जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, पाणी व स्वच्छता विभागाच्याउपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे यांच्यासह विविध तालुक्यांचे गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच सरंपच उपस्थित होते.
केंद्र तसेच राज्य शासनातर्फे पक्का निवारा नसणाऱ्या विविध समूहातील कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ही घरकुल योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. त्यासाठी विशेष असा पुरस्कारही दिला जातो. तर अमृत महाआवास अभियान ग्रामीण २०२२-२३ सुरू करण्यात आले आहे. याचा विभागस्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये पुणे विभागात सातारा जिल्ह्याने सर्वच पातळीवर यशाचा डंका वाजवला आहे.
सर्वोत्कृष्ट जिल्हे या प्रकारात प्रधानमंत्री आवास ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत योजनेत सातारा जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर सर्वोत्कृष्ट तालुके प्रकारात प्रधानमंत्री योजनेत जावळी, कराड आणि सातारा तालुक्यांनी अनुक्रमे तीन क्रमांक प्राप्त केले. तसेच राज्य योजनेत महाबळेश्वर तालुक्याने प्रथम तर माणला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींसा तीं ठीही पुरस्कार होते. यामध्ये प्रधानमंत्री योजनेत कऱ्हाड तालुक्यातील येळगाव आणि पाटणमधील भुडकेवाडीने प्रथम तर पाटण तालुक्यातीलच काठी ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक मिळवला. राज्य
योजनेत पाटणमधील बोंद्री बों ग्रामपंचायत प्रथम क्रमांकावर राहिली आहे. शासकीय जागा उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार देण्यात आला आहे.
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत तीनही तालुके सातारा जिल्ह्यातील आहेत. कोरेगाव, सातारा आणि कराड तालुक्यांनी अनुक्रमे क्रमांक मिळवला. तर वाळू उपलब्धतेत सर्वोत्कृष्ट कामगिरीत प्रधानमंत्री आणि राज्य पुरस्कृत योजनेतही पाटण तालुका प्रथम राहिला आहे. या यशाचा गाैरव सोहळा पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुंडलवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.