कराड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ

0
665
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड आवारातील अंतर्गत सर्वच रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ जेष्ठ व्यापारी व विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आला. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बाजार समितीच्या स्वनिधीतून होणाऱ्या रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक सतीश इंगवले, संभाजी चव्हाण, नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, जयंतीलाल पटेल, जे.बी.लावंड, सर्जेराव गुरव, विजयकुमार कदम, गणपत पाटील, संचालिका श्रीमती इंदिरा जाधव-पाटील, सौ.रेखाताई पवार, रयत संघटनेचे प्रा.धनाजी काटकर, कराड ख.वि.संघाचे चेअरमन अनिल मोहीते, कोयना बँकेचे चेअरमन रोहीत पाटील, स्वा.सै.शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन शहाजी शेवाळे,रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक,मक्तेदार उदय डी जाधव तसेच बाजार समितीचे सर्व कर्मचारी,आडते,व्यापारी,हमाल व मापाडी यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी अँड.उदयसिंह पाटील म्हणाले की,बाजार समितीच्या मुख्य मार्केट आवारामधील संपूर्ण अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होणेबाबत व्यापारी वर्गाची मोठया प्रमाणात मागणी होत होती.त्यामुळे या आवारातील अंदाजे 1500 मीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण स्वनिधीतून करण्याचा निर्णय बाजार समितीच्या संचालक मंडळाने घेतला होता. त्या कामाचा शुभारंभ संपन्न होऊन डांबरीकरणाचे काम लवकरच पूर्णतःवाला जात असल्याचा मनस्वी आनंद होत आहे.येथून पुढेही शेतकरी,व्यापारी यांचे हित डोळयासमोर ठेवून त्यांच्या समस्या सोडवण्याकरिता विद्यमान संचालक मंडळ सतत प्रयत्नशील राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.