कोल्हापुरातील राजाराम, शिंगणापूर बंधारा गेला पाण्याखाली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी। पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आहे. या जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. आज पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. त्यामुळे मार्गावरील वाहतूक बंद झाली. तर त्या पाठोपाठ शिंगणापूर बंधारा ही पाण्याखाली गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावर सध्या १६.७ इंच पाणी पातळी आहे. शुक्रवारी सकाळी पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले. त्यामुळे कसबा बावडा, वडणगे, निगवे दुमाला वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच शिंगणापूर बंधाऱ्यावरील वाहतूक ही बंद झाली आहे. मात्र, नागरिक अशातही धोकादायकरित्या वाहतूक करीत आहेत.

राधानगरी धरणक्षेत्रात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मात्र, अजूनही दमदार आणि जोरदार पाऊस नसल्याने पंचगंंगेसह सर्वच नद्या, तलावांतील पाणीपातळी खालावलेलीच आहे. परिणामी, सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. पेरणीच्या कामाला समाधानकारक वेग आला नाही.