वाढला उन्हाळा, आरोग्य सांभाळा; उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणती फळे खाल?

0
521
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सध्या सूर्यनारायण आग ओकू लागला असून तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिक थंड व फळांचे रस घेण्याकडे वळत आहेत, सध्या बाजारात विविध प्रकारची फळे दाखल झाली आहेत. या फळांचे दर आवाक्यात असून, या दिवसात शरीराला थंड ठेवतील आणि आरोग्यदायी फळांचे सेवन केले जात आहे.

उन्हाळा म्हटलं की प्रत्येकालाच आरोग्याची काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी रुमाल, टोपी, छत्रीचा नागरिक सर्रासपणे वापर करतात, तर शरीराचे तापमान राखण्यासाठी या काळात रस, मठ्ठा, लस्सी, लिंबू सरबत भी शीतपेयेदेखील घेतात. आरोग्य बिघडू नये म्हणून संत्रा, मोसंबी, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, टरबूज, खरबूज, पपई, ड्रॅगन फ्रूट, चेरी, आंबा, अननस, डाळिंब, अंजीर यासारखी फळेदेखील नागरिक खातात. उन्हाळ्यात मोजक्याच फळांना अधिक मागणी वाढते. आरोग्यासाठी फळांचे सेवन करणे फायदेशीर असल्याने ते खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

fruit

कराडच्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात लालेलाल कलिंगड

कराड शहरातील नागरिकांना व बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना उत्तम प्रकारची फळे मिळावीत यासाठी कराड रुग्णालय परिसरात क्लिंपासून पर्येक फळे सध्या विक्रीसाठी आहेत. या ठिकाणी असलेल्या रुग्णालयातील रुग्णाच्या रुग्णांना उत्तम आरोग्यदायी फळे याठिकाणी आहेत. सध्या कलिंगडची आवक जास्त होत असल्याने या ठिकाणी कलिंगड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.

कलिंगड खातोय ‘भाव’

सध्या उन्हाळा तीव्र असल्या कारणाने शरीराला थंडावा देण्यासाठी व शरीरातीळ पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी कलिंगड खाणे आरोग्यसाठी अधिक फायदेशीर आहे. मात्र, वाढती मागणी लक्षात घेता पाच ते सहा किलोचे एक कलिंगड १५० ते २०० रुपये दराने विकले जात आहेत.

उन्हाळ्यात कोणती फळे खायला हवीत?

१) टरबूज : टरबुजामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे बाहेर पडणारे पाणी लक्षात घेता रसाळ फळे खाणे उपयुक्त ठरते.

२) आंबा : उष्णता पचवण्यासाठी आंबा अधिक फायदेशीर असतो. पिकलेला आंबा वातदोष कमी करतो. याबरोबरच शरीर शक्तीदेखील वाढवतो.

३) द्राक्ष : पिकलेली द्राक्षे वात आणि पित्त दोष कमी करतात. अशक्त्ततेमुळे होणाऱ्या रोगांना दूर ठेवतात. द्राक्षांचा रस उन्हाळ्यात उत्तम असतो.

४) डाळिंब : उष्णतेचा फटका बसला असल्यास डाळिंबाचा रस उपयुक्त ठरतो. यामुळे शरीराला आराम मिळतो.

५) शहाळे : उन्हाळ्यात उष्णतेने लघवीचा दाह होत असेल तर शहाळ्याचे पाणी त्यावर उपायकारक ठरते, शहाळ्याचे पाणी पिणे आरोग्यवर्धक आणि शक्तिवर्धक असते.

फळांचा भाव काय?

१) टरबूज : ३० ते ५० रुपये नग
२) कलिंगड : २० ते ३० रुपये किलो
३) पेरू : 65 रुपये किलो
४) सफरचंद : 200 रुपये किलो
५) केळी : 50 रुपये डझन
६) काळे द्राक्षे : 120 रुपये किलो
७) पांढरी द्राक्षे : 100 रुपये किलो
८) टरबूज : 1 नग 50 रुपये
९) चिकू: 120 रुपये किलो
१०) संत्री : 250 रुपये किलो
११) मोसंबी : 120 रुपये किलो
१२) डाळींब : 200 रुपये किलो
१३) किवी : 130 रुपये 4 पिस
१४)आंबा : १७०० ते २००० रुपये डझन
१५) अननस : ४० ते ६० रुपये नग