कराड प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज रविवारी दि. 18 जून रोजी सातारा जिल्ह्यात आगमन होणार आहे. तब्बल 5 दिवस पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात मुक्कामी असणार आहे. या सोहळयानिमित्त जिल्ह्यात वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आज पाडेगाव, लोणंद येथे पालखी सोहळा प्रवेश करणार असून त्यानंतर लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या ठिकाणी मुक्काम करुन 23 जूनला सोलापूर जिल्हयात जाणार आहे. हा पालखी सोहळा हा निरा लोणंद फलटणमार्गे पंढरपूर रस्त्याने जाणार असल्याने तसेच पालखी सेाहळयात लाखो भाविक सहभागी होणार आहेत.
पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होऊ नये याकरिता पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील वाहनांखेरीज इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर 18 जून ते 23 जून 2023 या कालावधीत प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
पाडेगावात पालखी सोहळ्याचे स्वागत
पाडेगाव येथे सातारा जिल्ह्याच्यावतीने पालखी सोहळ्याचे स्वागत केल्यानंतर, रात्री लोणंद येथे हा सोहळा मुक्कामी राहणार आहे. लोणंद येथील दोन दिवसाच्या मुक्कामानंतर मंगळवारी (दि. २०) पालखी सोहळा तरडगाव (ता. फलटण) येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त असा असणार वाहतुकीमधील बदल
शनिवार, (ता.18 जून) सकाळी 6 वाजल्यापासून ते 21 जून 2023 रोजीचे 24 वाजेपर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे. यामध्ये आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळयातील येणाऱ्या वाहनाखेरीज इतर वाहनांना बंदी करण्यात येत आहे. लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. तसेच फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि. 21 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. तसेच नातेपुते कडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे.
दि. 21 जून 2023 रोजीचे 00.00 पासून ते दि.23 जून 2023 रोजीचे 16.00 वा. नातेपुते कडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी -सातारा अशी वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते-दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. तसेच नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी-वाठार फाटा मार्गे वळविण्यात येत आहे.
दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी- शिंगणापूर-तिकाटणे-वडले-पिंप्रद-बरड अशी वळविण्यात येत आहे. पालखी सेाहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळयातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये जा करतील याची इतर वाहन धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पाेलिसांनी केले आहे.