वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातून एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल लंपास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल चोरीस तर एका महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

उपजिल्हा वेणूताई चव्हाण बाह्य रुग्णालयात कराडसह इतर तालुक्यातून अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. गोरगरीब लोकांसाठी वरदान ठरणाऱ्या कराडमधील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून चोरीचे ग्रहण लागले आहे. विशेष म्हणजे एकाच रात्री तब्बल सहा मोबाईल चोरीस गेली असून एका महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासन व पोलिसांनी वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.

उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेली एक महिला बाथरूममध्ये गेली असता बाथरूमच्या खिडकीतून संबंधित महिलेचे मंगळसूत्र लंपास करण्यात आल्याचा प्रकार घडला. चोरीचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.