सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड 2024 घोषित झाला आहे. लोकांची आणि देशाची सेवा करत असल्याबद्दल जितेंद्र डुडी यांचे अभिनंदन करून समाज आणि सार्वजनिक सेवेसाठी आपले कार्य अनेकांना प्रेरणा देणारे ठरेल अशा शब्दांत यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू आणि अरुण बोंगीरवार फाउंडेशनच्या अध्यक्षा लता बोंगीरवार यांनी केले आहे.
सदरचा पुरस्कार रविवार दि.६ऑक्टोबर२०२४ रोजी वनामती, एज्युकेशन सेंटर, नागपूर येथे संध्याकाळी ४वा. प्रदान करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी यशदाच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहमतीने महाराष्ट्रातील नागरी सेवकांच्या उत्कृष्ट कार्यास मान्यता देण्यासाठी अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सलन्स अवॉर्ड्स ची स्थापना करण्यात आली आहे.
अरुण बोंगीरवार फाउंडेशनची स्थापना श्री अरुण बोंगीरवार यांच्या वारशाचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली आहे. फाउंडेशन सार्वजनिक सेवेसाठी त्यांचे समर्पण पुढे नेण्याचा प्रयत्न करते.या पुरस्कारांद्वारे उत्कृष्ट लोकसेवकांच्या कार्यास प्रोत्साहन दिले जाते. याद्वारे अनेकांना असेच उत्कृष्ट, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण काम करण्याची प्रेरणा मिळते.