सातारा प्रतिनिधी । श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सालाबादप्रमाणे दि. 29 जून 2024 रोजीपासून सुरू होणार आहे. दि. 6 जुलै 2024 रोजी पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होणार असून दि. 11 जुलै 2024 रोजी पालखी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
पालखी सोहळ्याचा जिल्ह्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. शनिवार दि. 6 जुलै रोजी निरा पूल, सकाळचा विसावा निरा पूल दुपारचा नैवेद्य व निघण्याचे ठिकाण निरा पूल, दुपारचा विसावा निरा पूल, रात्रीचा मुक्काम लोणंदमध्ये असणार आहे. रविवार दि. 7 जुलै रोजी लोणंद येथे दिवसभर व रात्रीचा मुक्काम असेल तर सोमवार दि. 8 जुलै रोजी सकाळचा विसावा व दुपारचे भोजन लोणंद येथे घेऊन दुपारी लोणंद येथून निघून दुपारचा विसावा चांदोबाचा लिंब येथे होईल तर मुक्काम तरडगांव येथे होणार आहे.
मंगळवार दि. 9 जुलै रोजी सकाळी तरडगाव येथून प्रस्थान होईल. सकाळचा विसावा दत्तमंदिर काळज, दुपारचे भोजन निंभोरे ओढा, दुपारचा विसावा वडजल व फलटण दूध डेअरी, रात्रीचा मुक्काम फलटण (विमानतळ) येथे असणार आहे. बुधवार दि. 10 जुलै रोजी सकाळी फलटण येथून प्रस्थान, सकाळचा विसावा विडणी, दुपारचे भोजन पिंपरद, दुपारचा विसावा निंबळक फाटा, रात्रीचा मुक्काम बरड येथे असेल.
गुरुवार दि. 11 जुलै रोजी बरड येथून प्रस्थान, सकाळचा विसावा साधबुवाचा ओढ, दुपारचे भोजन धर्मपुरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ, दुपारचा विसावा शिंगणापूर फाटा (पानसकर वाडी) येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश व रात्रीचा मुक्काम नातेपुते(जि. सोलापूर) येथे असणार आहे.